शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

गरोदर महिलांनाही देणार कोराेना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:21 IST

नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या जानेवारी महिन्यापासून कोरोना प्रतिबंधक लसी नागरिकांना दिल्या जात आहेत. १८ ते पुढील सर्व वयोगटातील नागरिकांना ...

नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या जानेवारी महिन्यापासून कोरोना प्रतिबंधक लसी नागरिकांना दिल्या जात आहेत. १८ ते पुढील सर्व वयोगटातील नागरिकांना लसी दिल्या जात आहेत. यात गरोदर व स्तनपान महिलांना यापूर्वी परवानगी देण्यात आलेली नव्हती. मात्र ३ जुलैपासून परवानगी मिळाल्याने आता लसीकरणासाठी महिलांचा प्रतिसाद वाढत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

लसीकरणाला प्रारंभ झाल्यानंतर गर्भवती आणि स्तनदा मातांना लसीकरणातून वगळण्यात आले होते. आरोग्याच्यादृष्टीने हा निर्णय घेतला गेला होता. परंतु गर्भवती मातांना कोणताही धोका नसल्याचे दिसून आल्यानंतर त्यांना लसीकरण करण्यास परवानगी दिली गेली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील १०० च्या जवळपास केंद्रांवर लसीकरण वेगात सुरू आहे. जिल्ह्यातील गर्भवती माता व स्तनदा मातांनाही लस देण्यास प्रारंभ करण्यात आल्याची माहिती असून त्यांची नोंदणी करून पुढील कामकाज करण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

गरोदर महिलांनी लस घेण्यापूर्वी काळजी घ्यावी

गरोदर महिलांच्या लसीकरणाविषयी अनेकांमध्ये संभ्रमाची स्थिती होती. परंतु जागतिक आरोग्य संघटनेने गरोदर महिलांसाठी कोविडची लस सुरक्षित असल्याचे स्पष्ट केल्यानंतर लसीकरणाला सुरुवात केली गेली आहे.

गरोदर महिलांनी लस घेण्यापूर्वी काय काळजी घ्यावी याबाबतच्या सूचना दिल्या जात आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सर्वसामान्यांनी लस घेण्यापूर्वी जी काळजी घ्यावी, तीच काळजी गर्भवतींनीही घेतली पाहिजे असे सांगितले.

लस घेतल्यानंतर ताप आल्यास औषध घेण्यापूर्वी केंद्रावर उपस्थित असलेले वैद्यकीय अधिकारी किंवा ज्या डाॅक्टरांकडे नियमित तपासणी सुरू आहे त्यांचा सल्ला घ्यावा असेही आरोग्य विभागाने कळवले आहे.

स्तनदान किंवा गरोदर मातांनी मातांनी लस घेतल्यानंतर पुरेसा विश्रांतीदेखील घेणे गरजेचे आहे.

गरोदर महिलांनी लस घेण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे. केंद्रावर गेल्यानंतर किंवा नोंदणी करताना तशी माहिती द्यावी, आरोग्याबाबत काही तक्रारी असल्यास तशी माहिती द्यावी. गर्भवती मातांसाठी लस ही उपयोगी आहे.

-डाॅ. सुलोचना बागुल, स्त्रीरोगतज्ज्ञ

सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. अशा काळात गरोदर माता व बाळाची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. अशा काळात प्रत्येक गरोदर मातेने कोेराेना लस घेतल्यास संरक्षण मिळू शकते. लस घेतल्यानंतर विश्रांतीदेखील महत्त्वाची आहे.

-डाॅ. के.डी. सातपुते, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक.