शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

गाव कोरोनामुक्त होण्यासाठी विविध विभागांचे सहकार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:31 IST

महसूल विभागाचे सहकार्य कोरोनाकाळात महसूल विभागाने विलगीकरण कक्ष उभा करून जे पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, मात्र त्यांच्यात कोणतीही लक्षणे नाही, ...

महसूल विभागाचे सहकार्य

कोरोनाकाळात महसूल विभागाने विलगीकरण कक्ष उभा करून जे पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, मात्र त्यांच्यात कोणतीही लक्षणे नाही, अशा रुग्णांना त्यांनी विलगीकरण कक्षामध्ये ठेवून ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांच्या सहकार्याने त्यांच्यावर वेळोवेळी उपचार करून सेवा दिली. येथील विलगीकरण कक्षातून २४ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. सद्य:स्थितीत विलगीकरण कक्षात एकही रुग्ण नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांताधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, सद्‌गुरू धर्मशाळेचे ट्रस्टी यांचे योगदान त्यासाठी राहिले आहे.

पोलिसांचा वचक

प्रकाशा येथील पोलीस दूरक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी खाकी वर्दीचा धाक दाखवत लॉकडाऊनच्या काळात नियम न पाळणाऱ्यांवर व विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. तसेच पाच जणांवर गुन्हेही दाखल केलेले आहेत. त्यामुळे गावाला शिस्त लागली आहे. हे करत असताना त्यातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी वेळीच उपचार घेतल्याने त्यातून ते सुखरूप बाहेर पडले. गावात सकाळी ७ वाजेपासून ते ११ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानदारांना मुभा दिली आहे. मात्र, दुपारी ११ वाजेनंतर दुकाने बंद झाली की नाही, ते पाहण्यासाठी स्वतः पोलीस गावात फिरून लॉकडाऊन करतात. वेळोवेळी गावात फिरून चौकाचौकांत बसलेल्या तरुणांना समज देऊन त्यांना घरी पाठवतात.

आरोग्य विभागातर्फे विविध उपक्रम

प्रकाशा येथील आरोग्य विभागाने वेळोवेळी विविध उपक्रम राबवले. यामध्ये विलगीकरण कक्षात दाखल झालेल्या रुग्णांना दिवसातून दोन ते तीनवेळा भेटी देऊन त्यांचे ऑक्सिजन, तापमान तपासणी करून औषधोपचार केले. आजच्या स्थितीला विलगीकरण कक्षामध्ये एकही रुग्ण नाही. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू केले आहे. यात कोरोनाचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या आता एक हजार ५१ तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या २७५ झाली आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अंतर्गत अंगणवाडीसेविका, आशा कार्यकर्ती, आरोग्यसेवक, शाळेचे शिक्षक आदींच्या सहकार्याने गावात आजही सर्व्हे सुरू आहे.

शिक्षकांचे सहकार्य

प्रकाशा गावातील प्राथमिक व माध्यमिक शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांनी विलगीकरण कक्षात दाखल रुग्णांसाठी शिक्षकांची ड्युटी लावली होती. गेल्या १५ ते २० दिवसांपासून शिक्षक व मुख्याध्यापक याठिकाणी उपस्थित होते. आताही ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’अंतर्गत गावात सर्व्हे करीत आहेत व कोरोनाची लस घेण्यासाठी गावातील नागरिकांमध्ये जनजागृती करीत आहेत.

ग्रामस्थ, व्यापारी यांच्या सहकार्यासह ग्रामपंचायत, शासनाच्या विविध विभागांनी राबविलेल्या उपक्रमामुंळे प्रकाशा गाव कोरोनामुक्त झाले आहे. ही प्रकाशा गावासाठी आनंदाची वार्ता आहे. गावात आता ही कोरोनाची साखळी तुटली आहे, ती तशीच राहावी, यासाठी प्रकाशा ग्रामस्थांनीही स्वतः काळजी घेत, मास्क वापरताना दिसून येत आहेत. काही दुकानांवर वस्तू खरेदी करताना होणारी गर्दी टाळून सोशल डिस्टन्सिंगचे पालन होणे गरजेचे आहे. अशाच प्रकारे प्रत्येकाने स्वत:ची व इतरांची काळजी घेऊन कोरोना नियमांचे पालन केले, तर गाव कायमस्वरूपी कोरोनामुक्त होईल, यात शंका नाही.

प्रकाशा गावात आज एकही कोरोना रुग्ण नाही. ग्रामस्थांनी अजून काही दिवस काळजी घेत शासनाचे नियम पाळावयाचे आहेत, जेणेकरून गावात कोरोनाचे रुग्ण आढळून येणार नाहीत.

-सुदाम ठाकरे, सरपंच, प्रकाशा ग्रामपंचायत

प्रकाशा गावात गेल्या १२ दिवसांपासून एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाही, ही गावासाठी शुभवार्ता आहे. कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी ग्रामस्थांकडून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे गाव कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत आहे.

डॉ. विवेक बावस्कर, वैद्यकीय अधिकारी, प्रा.आ. केंद्र, प्रकाशा