शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

रॅायल्टी वाढल्याने बांधकाम महागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:20 IST

नंदुरबार : गौण खनिजाच्या स्वामित्व धनाच्या दरात सुधारणा करण्यात आली आहे. येत्या १ जुलैपासून नवीन दर लागू झाले असल्याची ...

नंदुरबार : गौण खनिजाच्या स्वामित्व धनाच्या दरात सुधारणा करण्यात आली आहे. येत्या १ जुलैपासून नवीन दर लागू झाले असल्याची माहिती गौण खनिज विभागातर्फे देण्यात आली.

बांधकाम साहित्य म्हणून वापरण्यात येणारा चुना तयार करण्यासाठी भट्ट्यांमध्ये वापरण्यात येणारी चुनखडी व शिंपल्यापासून केलेल्या चुन्याचा दर आता ६०० रुपये प्रतिब्रास असणार आहे. उत्खननाद्वारे किंवा गोळा करून काढलेले सर्व दगड आणि दगडाच्या भुकटीचा दरदेखील तेवढाच असणार आहे.

बांधकामासाठी वापरण्यात येणारा जांभा दगडाचा (लॅटराइट स्टोन) दर १५० रुपये प्रतिब्रास, उत्खननाद्वारे काढलेले किंवा गोळा केलेले गोटे, बारीक खडी, मुरूम, कंकर यांचा दर ६०० रुपये प्रतिब्रास आणि केवळ बॉलमिल्सच्या प्रयोजनाकरिता वापरण्यात येणारे चॅल्सेडोनी खडे यांचा दर तीन हजार रुपये प्रतिब्रास असणार आहे.

सिरामिक किंवा मृतिकाशिल्पे तयार करण्याच्या प्रयोजनार्थ, धातुशास्त्रीय प्रयोजनार्थ, दृष्टीविषयक प्रयोजनार्थ, कोळसा खाणीमध्ये साठवून ठेवण्याच्या प्रयोजनार्थ, सिल्व्हीक्रेट सिमेंट तयार करण्यासाठी आणि मातीची भांडी आणि काच सामान तयार करण्यासाठी वापरण्यात न येणाऱ्या सर्वसामान्य वाळूचा दर १२०० रुपये प्रतिब्रास, तर मुंबई महानगर प्रदेश क्षेत्र वगळून इतर क्षेत्रांकरिता ६०० रुपये प्रतिब्रास असणार आहे.

कौले (मंगलोरी किंवा अन्य कोणत्याही प्रयोजनाची) तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी साधी चिकण माती, अंतर्गत बंधारे, रस्ते, लोहमार्ग आणि इमारती यांचे बांधकाम करताना भरणा करण्यासाठी/भूपृष्ठ सपाट करण्यासाठी वापरण्यात येणारी साधी माती, बांधकामाचे साहित्य म्हणून वापरण्यात येते त्यावेळी पाटीचा दगड किंवा नरम खडक या सर्वांचा दर ६०० रुपये प्रतिब्रास असणार आहे.

इतर सर्व गौण खनिज (ग्रॅनाइट वगळून) आणि केंद्र शासन घोषित दर ६०० रुपये प्रतिब्रास असेल. गौण खनिजांचे ठोकबंद भाडे (ग्रॅनाइट वगळून आणि केंद्र शासनाने दिनांक १० फेब्रुवारी २०१५ अन्वये घोषित केलेली गौण खनिजे वगळून) दर नऊ हजार प्रतिहेक्टर किंवा त्याच्या भागासाठी असेल, असे अपर जिल्हाधिकारी महेश पाटील यांनी कळविले आहे.