बांधकाम पाटील तर कृषी रघुवंशीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 11:51 AM2020-02-18T11:51:26+5:302020-02-18T11:51:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या विषय समितींचे वाटप आणि त्यातील सदस्यांची निवड समन्वयाने करण्यात आली. यासाठी सोमवार, ...

Construction will be done by Krishi Raghuvanshe | बांधकाम पाटील तर कृषी रघुवंशीकडे

बांधकाम पाटील तर कृषी रघुवंशीकडे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या विषय समितींचे वाटप आणि त्यातील सदस्यांची निवड समन्वयाने करण्यात आली. यासाठी सोमवार, १७ रोजी झालेल्या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यक्षा सिमा वळवी होत्या. दरम्यान, लक्ष लागून असलेली बांधकाम व अर्थ समिती अखेर अभिजीत पाटील यांच्याकडे गेली.
महिनाभरापूर्वी अर्थात १७ जानेवारी रोजी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड करण्यात आली होती. त्यानंतर विषय समिती सभापतींची निवड झाली. त्यात समाजकल्याण समिती रतन खत्र्या पाडवी यांच्याकडे तर महिला व बालकल्याण समितीवर निर्मला सिताराम राऊत यांची निवड झाली होती. अभिजीत पाटील व जयश्री पाटील यांच्यासह उपाध्यक्ष राम रघुवंशी यांना समिती वाटप करण्याचे बाकी होते. या तिघांना विषय समिती वाटप आणि विषय समितींवर सदस्यांच्या निवडीसाठी सोमवारी दुपारी बैठक झाली. अध्यक्षस्थानी अध्यक्षा सिमा वळवी होत्या.
उपाध्यक्ष राम चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन आणि दुग्ध समिती देण्यात आली आहे. अभिजीत मोतिलाल पाटील यांच्याकडे अर्थ व बांधकाम समिती देण्यात आली तर जयश्री दिपक पाटील यांच्याकडे आरोग्य, शिक्षण व क्रिडा समिती देण्यात आली आहे.
यानंतर विविध समितींवर सदस्यांची देखील निवड करण्यात आली.
जलव्यवस्थापन समिती
जलव्यवस्थापन समितीच्या पदसिद्ध सभापती या अध्यक्षा असून उपाध्यक्षांसह चारही सभापती व अजित नाईक, सुहास नाईक, सुरेश गावीत, विजया गावीत, वृंदाबाई गावीत व शकुंतला शिंत्रे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
स्थायी समिती
स्थायी समितीच्या पदसिद्ध सभापती या अध्यक्षा असून उपाध्यक्षांसह चारही सभापती आणि मधुकर नाईक, अर्चना गावीत, देवमन पवार, छत्रसिंग पाडवी, हिरा पाडवी, धनराज पाटील, भरत गावीत व विजयसिंग पराडके यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
अर्थ समिती
अर्थ समितीत सभापती अभिजीत पाटील यांच्यासह सदस्य म्हणून प्रताप वसावे, राया मावची, छत्रसिंग पाडवी, कपिलदेव चौधरी, राजेश्री गावीत, रुचिका पाटील, पार्वती गावीत व शकुंतला शिंत्रे हे सदस्य म्हणून राहतील.
बांधकाम समिती
अभिजीत पाटील सभापती तर राया मावची, जितेंद्र पाडवी, संगिता पावरा, रजनी नाईक, भूषण कामे, धरममसिंग वसावे, शोभा पाटील, शंकर पाडवी यांची सदस्य म्हणून निवड झाली.
कृषी समिती
राम रघुवंशी हे सभापती असून शैलेश वसावे, रुपसिंग तडवी, जान्या पाडवी, कविता पावरा, कुमुदिनी गावीत, संगिता वळवी, सुशिला कोकणी, मंगलाबाई जाधव, गुलाल भिल व हिरा पराडके यांची सदस्यपदी निवड करण्यात आली.
पशुसंवर्धन समिती
समितीचे सभापती हे राम रघुवंशी तर सदस्य म्हणून सुभाष पटले, प्रकाश कोकणी, प्रकाश गावीत, वंदना पटले, बायजाबाई भिल, मोगरा पवार, सुनिता पवार, गणेश पराडके यांनी निवड झाली.
शिक्षण समिती
सभापतीपदी जयश्री पाटील असून प्रताप वसावे, प्रकाश कोकणी, सुहास नाईक, शालीनीबाई सनेर, सुनिता पवार, वंदना पटले, मोगरा पवार व गणेश पराडके यांची सदस्य म्हणून निवड झाली.
आरोग्य समिती
जयश्री गावीत या सभापती तर शैलेश वसावे, सुभाष पटले, जान्या पाडवी, भारती भिल, राजेश्री गावीत, यशवंत ठाकरे, संगिता गावीत व रवींद्र पराडके यांची सदस्यपदी निवड झाली.
समाज कल्याण समिती
समाज कल्याण समिती सभापतीपदी रतन पाडवी असून सदस्यपदी निलूबाई पाडवी, रतिलाल कोकणी, गुलाल भिल, संगिता वळवी, बाजू वसावे, अजित नाईक, रुपसिंग तडवी, योगिनी भारती, वृंदाबाई नाईक, शालीनी सनेर व जिजाबाई ठाकरे यांची सदस्यपदी निवड झाली.
महिला व बालकल्याण
समिती सभापतीपदी निर्मला राऊत तर सदस्यपदी कविता पावरा, रजनी नाईक, मनिषा वसावे, पार्वती गावीत, जिजाबाई ठाकरे, मंगलाबाई जाधव, सुशिला कोकणी व बाजू वसावे यांची निवड करण्यात आली.

जिल्हा परिषदेत प्रतिष्ठेची असलेली बांधकाम व अर्थ समिती कुणाकडे जाते याबाबत विविध चर्चा रंगल्या होत्या. सुरुवातीला राम रघुवंशी यांचे नाव चर्चेत होते. नंतर त्यांचे नाव मागे पडले. त्यानंतर जयश्री पाटील व अभिजीत पाटील या शहादा तालुक्यातील सभापतींनी या समितीवर दावा सांगण्यास सुरुवात केली. दोघांपैकी कुणाला मिळते याबाबत उत्सूता होती. अखेर काँग्रेसचे अभिजीत पाटील यांनी त्यात बाजी मारली.

भिंत पाडल्याची १५ दिवसात चौकशी...

उपाध्यक्षांच्या दालनातील भिंत पाडल्याची चौकशी १५ दिवसात पुर्ण करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली. याबाबत अर्चना गावीत व राजेश्री गावीत यांनी प्रश्न उपस्थित केला होता. दोषी असल्यास संबधीत अधिकाऱ्यांविरुद्ध निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. त्यावर सीईओ गौडा यांनी उत्तर देत निष्पक्ष चौकशी होणार आहे. जो कुणी अधिकारी दोषी असेल त्याच्यावर अध्यक्षांच्या परवाणगीने प्रशासकीय कारवाई केली जाईल. त्यासाठी संबधितांना १५ दिवसांचा कालावधी देण्यात आल्याचे गौडा यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कार्यकारी अभियंता दिलीप चौधरी यांनी तक्रारकर्त्या अर्चना गावत यांना काय सांगितले होते ते सभागृहात सांगावे अशी मागणी त्यांनी केली, परंतु चौधरी यांनी आपण काहीही सांगितले नसल्याचा पवित्रा यावेळी घेतला.

अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड आणि विषय समिती सभापती निवडीच्या वेळी राजकारण ढवळून निघाले होते. मतदान प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यामुळे विषय समिती सदस्यांची निवड करतांना देखील ती परिस्थिती निर्माण होते किंवा कसे याबाबत संदिग्धता होती. ही बाब लक्षात घेता सोमवारी जिल्हा परिषदेने मतदानाचीही तयारी करून ठेवली होती.
ऐनवेळी मतदानाची मागणी झाली तर धावपळ व्हायला नको म्हणून तयारी पुर्ण करण्यात आली होती. परंतु गेल्या दोन्ही वेळचे कटू प्रसंग टाळून तिन्ही पक्षाच्या सदस्यांनी एकत्र येत सदस्यांची नावे सुचविली आणि त्याप्रमाणे सर्वच विषय समिती सदस्यांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने देखील सुटकेचा नि:श्वास घेतला.

Web Title: Construction will be done by Krishi Raghuvanshe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.