शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019 : तीन वेळा मतदारसंघ पुनर्रचनेत सिमांकनासह प्रवर्गही बदलले..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 11:43 IST

  मनोज शेलार ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : 1962 पासून आतार्पयत झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये तीन वेळा मतदारसंघांची पुनर्रचना ...

 

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : 1962 पासून आतार्पयत झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये तीन वेळा मतदारसंघांची पुनर्रचना केली गेली. सुरुवातीला संयुक्त धुळे जिल्ह्यात नंदुरबार विभागात चार मतदारसंघ होते. त्यानंतर 1972 मध्ये पुनर्रचना होऊन नंदुरबार विभागात पाच मतदारसंघ झाले. जिल्हानिर्मितीनंतर अर्थात 2009 च्या निवडणुकीत पुन्हा पुनर्रचना होऊन चार मतदासंघ झाले. सर्वच चारही मतदारसंघ अर्थात एस.टी.प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले.विधानसभा मतदारसंघांची व्याप्ती, त्यांचे सिमांकन, मतदार संख्या याबाबत सामान्य मतदारांना मोठी उत्सूकता असते.  1962 ची पहिली निवडणूकमुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर 1962 मध्ये पहिली निवडणूक लागली. त्यावेळी मतदार संघ रचना करतांना पश्चिम खान्देश या जिल्ह्यात नंदुरबार विभागात चार मतदारसंघ होते. त्यात नंदुरबार, नवापूर, तळोदा आणि अक्राणी. चारपैकी नंदुरबार मतदारसंघ खुल्या प्रवर्गासाठी तर इतर तिन्ही एस.टी.प्रवर्गासाठी राखीव होते. मतदार संघांचे सिमांकन ठरवितांना नवापूर मतदारसंघाला साक्री तालुक्याचा आदिवासी पट्टा जोडला गेला होता. नंदुरबार मतदारसंघ पुर्ण तालुक्याचा आणि शहादा तालुक्याचा तापी पट्टयाचा भाग जोडलेला होता. तळोदा मतदारसंघात तळोदा व अक्कलकुवा तालुक्यांचा तर अक्राणी मतदारसंघात संपुर्ण अक्राणी तालुका आणि शहादा तालुक्याचा सातपुडय़ाच्या पायथ्याशी असलेला  काही भाग जोडला होता. 1962 आणि 1967 ची निवडणूक याच रचनेप्रमाणे झाली. परंतु नंदुरबार मतदारसंघ हा सर्वसाधारण ऐवजी एस.टी.राखीव झाला.1978 मध्ये पुनर्रचना1978 मध्ये पुन्हा मतदारसंघांची पुनर्रचना करण्यात आली. या पुनर्रचनेत चार ऐवजी पाच मतदारसंघ नंदुरबार विभागात झाले. त्यात नवापूर मतदार संघांची रचना कायम ठेवण्यात आली. नंदुरबार मतदारसंघ संपुर्ण तालुक्याचा केला गेला. तळोदा मतदारसंघ तळोदा व अक्कलकुवा या दोन तालुक्यांचा कायम ठेवण्यात आला. धडगाव मतदारसंघ धडगाव तालुका आणि शहादा तालुक्यातील तीन महसूल मंडळांचा समावेश असलेला झाला तर नव्याने निर्माण झालेला शहादा मतदारसंघ शहादा तालुक्यातील तापी पट्टयाचा भागातील चार महसूल मंडळ आणि शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचासह तीन महसूल मंडळांचा बनला. यामुळे शहादा मतदारसंघ सर्वसाधारण झाला तर नंदुरबार मतदारसंघ एस.टी.राखीव झाला. साधारणत: सात निवडणुका याच रचनेनुसार झाल्या. 1978, 1980, 1985, 1990, 1995, 1999 व 2004 या निवडणुकांचा समावेश होता. पुन्हा चार मतदारसंघ2004 च्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा मतदारसंघांची पुनर्रचना करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी अर्थात 1998 साली नंदुरबार जिल्हा धुळे जिल्ह्यातून स्वतंत्र झालेला होता. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील गावे वगळण्याचा निर्णय त्यासाठी घेण्यात आला. अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार व नवापूर हे चार नवीन मतदारसंघ अस्तित्वात आले. चारही मतदारसंघ एस.टी.प्रवर्गासाठी राखीव झाले. दोन तालुक्यांचा एक मतदारसंघ अशी रचना त्यात राहिली. नंदुरबार मतदारसंघ सर्वसाधारण राहील अशी शक्यता असतांना तो राखीव झाला. 

असे आहेत मतदारसंघ..अक्कलकुवा : या मतदारसंघात संपुर्ण अक्कलकुवा व धडगाव तालुक्याचा समावेश.शहादा : मतदारसंघात संपुर्ण तळोदा तालुक्यासह शहादा तालुक्यातील म्हसावद, ब्राम्हणपुरी, असलोद, शहादा महसूल मंडळासह शहादा शहराचा समावेश.नंदुरबार : मतदारसंघात नंदुरबार शहरासह नंदुरबार, रनाळे, खोंडामळी कोरीट महसूल मंडळे तसेच शहादा तालुक्यातील कलसाडी, प्रकाशा, सारंगखेडा, वडाळी महसूल मंडळांचा समावेश आहे. नवापूर : मतदारसंघात संपुर्ण नवापूर तालुका आणि नंदुरबार तालुक्यातील धानोरा व आष्टे महसूल मंडळाचा समावेश.