शहादा येथे काँग्रेस पक्षाची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:21 IST2021-06-22T04:21:23+5:302021-06-22T04:21:23+5:30

शहादा येथे २४ रोजी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आहे. ...

Congress party meeting at Shahada | शहादा येथे काँग्रेस पक्षाची बैठक

शहादा येथे काँग्रेस पक्षाची बैठक

शहादा येथे २४ रोजी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर काॅँग्रेस पक्षातर्फे बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष पाटील, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष अशोक पाटील, किसान काँग्रेस नंदुरबार जिल्हा सरचिटणीस गणेशराजे रघुनाथ पाटील, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष हाजी मकसूद खाटीक, शहादा शहर अध्यक्ष अशोक मुकरंदे, शहादा तालुका अध्यक्ष डॉ. सुरेश नाईक, युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष वाजीद सैयद यांच्यासह पक्षाचे जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य तसेच विविध पदांवर असलेले पदाधिकारी, विविध सेल चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्ह्यात येत्या काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, ग्रामपंचायत व पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येत्या २४ जून रोजी मेळावा होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. प्रसंगी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

Web Title: Congress party meeting at Shahada