शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
2
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
4
IPL 2026: वैभव-यशस्वीची धडाकेबाज जोडी फ्लॉप! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला मोठा दिलासा
5
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
6
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
7
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
8
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
9
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
10
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
11
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
12
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
13
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
14
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
15
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
16
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
17
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
18
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
19
सहलीत सेल्फीचा मोह जिवावर बेतला, मावळच्या धरणात तीन मित्र बुडाले; एकाला वाचविण्यात यश
20
...तेव्हाच मुंबई, गोवा ड्रग्जमुक्त होऊ शकेल; इथे दबा धरून बसलेत हजारो सलीम डोला
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा-प्रतापपूर-मालदा रस्त्यावरील स्थिती; वाहतुकीला ठरताहेत अडथळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:31 IST

रस्ता निर्मितीचे काम झाल्यानंतर रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण झाले किंवा नाही, हे तपासणीचे काम गुणवत्ता व नियंत्रण विभाग म्हणजेच क्वाॅलिटी ...

रस्ता निर्मितीचे काम झाल्यानंतर रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण झाले किंवा नाही, हे तपासणीचे काम गुणवत्ता व नियंत्रण विभाग म्हणजेच क्वाॅलिटी कंट्रोल विभागाकडून करण्यात येते. ते तपासण्यासाठी कामात वापरलेल्या मुरूम, खडी डांबर यांचे नमुने घेतले जातात. त्यासाठी रस्त्यावर ठिकठिकाणी विशिष्ट आकाराचे खड्डे तयार करून नमुने घेतले जातात. त्या नमुन्यांचा आधार घेत रस्त्याचा दर्जा निश्चित करण्यात येतो.

याचप्रकारचे नमुने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या तळोदा-प्रतापपूर-मालदा या रस्त्यावर ठिकठिकाणी घेण्यात आले. नमुन्यासाठी रस्त्यावर ठिकठिकाणी साधारणत: एक ते सव्वा फुटाचे चौकोनी खड्डे तयार करून रस्त्याची गुणवत्ता तपाणसीसाठी नमुने घेतले गेले. रस्त्याच्या गुणवत्ता तपासणीसाठी क्वॉलिटी कंट्रोल विभागाने रस्त्याची गुणवत्ता तपासणी केल्याने नागरिकांनादेखील सुखद धक्का बसला. मात्र त्यानंतर क्वॉलिटी कंट्रोल विभागाने रस्त्याच्या गुणवत्ता तपासणीसाठी तयार केलेल्या या खड्ड्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांना नंतर मात्र या खड्ड्याचे धक्केच खावे लागत असल्याची स्थिती आहे.

रस्त्याचे नमुने घ्यायला तब्बल तीन ते चार महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र या खड्ड्यांचा प्रशासनाला विसर पडला आहे. अद्याप हे खड्डे बुजविण्यात आले नसून, हे खड्डे वाहतुकीला अडसर ठरत आहेत. या खड्ड्यांतून घेतलेल्या नमुन्यांमध्ये नंतर फक्त खडी भरली असल्याने ती निघून एक सव्वा फूट चौरस व तीन-चार इंच खोल खड्डे झाले आहेत. वाहनधारकांच्या लक्षात हे खड्डे येत नसल्याने त्यात वाहने अडकली जातात. त्यामुळे किरकोळ अपघात होत आहेत.

या समस्येकडे संबंधित विभागाने लक्ष घालून वाहतुकीस अडथडे ठरणारे खड्डे तात्काळ बुजविण्यात यावेत, अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.

हे खड्डे प्रथमदर्शनी लक्षात येत नाहीत. तब्बल तीन ते चार महिन्यांचा कालावधी उलटूनदेखील हे खड्डे अद्याप बुजविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अपघाताचा धोका आहे. - पन्नालाल पावरा, नागरिक, प्रतापपूर