नंदुरबारात १ ते १५ एप्रिल दरम्यान संपुर्ण लॅाकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:29 IST2021-03-28T04:29:12+5:302021-03-28T04:29:12+5:30

नंदुरबार : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी डॅा.राजेंद्र भारूड यांनी १ ते १५ एप्रिल दरम्यान संपुर्ण ...

Complete lockdown in Nandurbar from 1st to 15th April | नंदुरबारात १ ते १५ एप्रिल दरम्यान संपुर्ण लॅाकडाऊन

नंदुरबारात १ ते १५ एप्रिल दरम्यान संपुर्ण लॅाकडाऊन

नंदुरबार : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी डॅा.राजेंद्र भारूड यांनी १ ते १५ एप्रिल दरम्यान संपुर्ण लॅाकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. दरम्यान, शनिवार व रविवार या दोन दिवशीय जनता कर्फ्यूला पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला.

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. ही बाब लक्षात घेता कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून लॅाकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे. १ ते १५ एप्रिल या दरम्यान हे लॅाकडाऊन राहणार आहे. या काळात केवळ दवाखाने, मेडिकल, बॅंका सुरू राहतील. जिल्ह्याच्या सिमा सील करण्यात येणार आहेत. दरम्यान, शनिवार व रविवारचा जनता कर्फ्यू अंतर्गत शनिवारी चांगला प्रतिसाद मिळाला. नंदुरबारसह सहाही तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी शुकशुकाट होता. जिल्ह्यातील काही मोठ्या गावांनी देखील स्वत:हून बंद पाळला.

Web Title: Complete lockdown in Nandurbar from 1st to 15th April