शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

कंपनीचे ४४ हजार वीज ग्राहकांकडे थकले २२ कोटी रुपयांचे वीज बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:27 IST

एकूण २२ कोटी रुपयांच्या थकबाकीत केवळ घरगुतीच नव्हे तर व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांच्या वीज बिलांच्या थकीत रकमेचा समावेश ...

एकूण २२ कोटी रुपयांच्या थकबाकीत केवळ घरगुतीच नव्हे तर व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांच्या वीज बिलांच्या थकीत रकमेचा समावेश आहे. बिल थकीत असलेल्या ४४ हजार ग्राहकांपैकी १ हजारपेक्षा अधिक ग्राहकांची वीज बिलांची रक्कम ही लाख रुपयांच्या पुढे असल्याची माहिती समोर आली आहे. व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रासाठी हे वीज बिल वापरण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान कंपनीकडून बिलांच्या वसुलीची मोहीम अधिक गतिमान करण्यात आली असून मोठ्या रकमा असलेल्या ग्राहकांसोबत दरदिवशी संपर्क करून वीज बिल भरण्यासंदर्भात माहिती घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरमहा वसुलीच्या सुमारे ८० ते ८५ टक्के रकमेतून वीजखरेदी केली जाते. वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा सुरू असल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. मात्र दर महिन्यात होणाऱ्या वीज बिल वसुलीचे प्रमाण कमी असल्याने वीजखरेदी, कंत्राटदारांची देणी, कर्जांचे हप्ते, आस्थापना खर्च, दैनंदिन देखभाल व दुरुस्ती खर्च भागवणे अशक्य होत असल्याने मोहीम तीव्र करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. ग्राहकांकडे शिल्लक असलेल्या थकबाकीमुळे वीज पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने कंपनीकडून वसुली केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान कंपनीकडून इन्स्टाॅलमेंट पद्धतीने वीज बिल भरण्याची मुभा देेण्यात आली असल्याने ग्राहकांना सोयीचे झाले असल्याचा दावा वीज वितरण कंपनीकडून करण्यात आला आहे.

वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांच्या सोयीसाठी कामकाज करण्यात येत आहे. घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक अशा तिन्ही ठिकाणच्या वीज बिलांचा भरणा ग्राहकांनी करावा यासाठी त्यांना वेळोवेळी सुचवले जात आहे. ग्राहकांचे वीज बिल अधिक असल्यास त्यांना टप्प्याटप्प्याने बिल भरता यावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. सर्व प्रकारच्या बिलांची योग्य पद्धतीने वसुली करण्यात येईल. ग्राहकांनी सहकार्य केल्यास जिल्ह्यातील थकीत बिलांची वसुली लवकर होणार आहे. शेतकऱ्यांसाठी वीज कंपनीने चांगली योजना आणली आहे.

-अनिल बोरसे,अधीक्षक अभियंता, नंदुरबार.

नंदुरबार जिल्ह्यातील ५५ हजार ५०७ कृषिपंप ग्राहकांकडे सद्य:स्थितीत ७४५ कोटी ३१ लाख रुपयांची एकूण थकबाकी आहे. यातील निर्लेखन, व्याज व विलंब आकाराचे एकूण २५८ कोटी ८० लाख रुपये महावितरणकडून माफ करण्यात आले आहेत. या कृषी ग्राहकांनी उरलेल्या ४८६ कोटी ५१ लाखांच्या मूळ थकबाकीपैकी ५० टक्के रकमेचा वर्षभरात भरणा केल्यास थकबाकीची उर्वरित ५० टक्के म्हणजे २४३ कोटी २५ लाखांची रक्कम माफ करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील ४४ हजार ३२३ ग्राहकांकडे २२ कोटी रुपयांची बिलांची रक्कम थकीत आहे. रकमेची वसुली करण्यासाठी मोहीम उघडण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे धोरण स्वीकारले गेले आहे. यातून काही ठिकाणी नाराजीही व्यक्त करण्यात आली आहे. औद्योगिक क्षेत्रातही याचप्रकारे कामकाज सुरू आहे.