शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जनांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सिव्हिलच्या पार्किंगसाठी निश्चित जागी वाढू लागलेय व्यावसायिक अतीक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 12:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील अतीक्रमण गेल्या अनेक वर्षांपासून चिंतेचा विषय आहे. याठिकाणी रुग्णालयाने सहा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील अतीक्रमण गेल्या अनेक वर्षांपासून चिंतेचा विषय आहे. याठिकाणी रुग्णालयाने सहा वर्षांपूर्वी बाहेरुन येणा-यांची वाहने पार्किंगचा प्रस्ताव दिला होता. परंतू अतीक्रमणामुळे तो बारगळला आहे. यातून दुचाकींच्या गराड्यातून रुग्णवाहिका निघू शकत नसल्याने रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे.           नंदुरबार जिल्हा निर्मितीनंतर काही वर्षांत साक्री रस्त्यालगत विस्तीर्ण अशा मोकळ्या जागेवर जिल्हा रुग्णालय उभारण्यात आले आहे. जिल्ह्यातील शेकडो नागरीकांचा याठिकाणी राबता असल्याने या परिसरात इतर व्यवसायही सुरु झाले आहेत. दरम्यान गेल्या १० वर्षात या व्यावसायिकांनी रुग्णालयाचे मुख्य प्रवेशद्वारच काबीज केल्याचे दिसून आले आहे. याठिकाणी प्रामुख्याने रुग्णांच्या नातेवाईकांसाठी विविध खाद्यपदार्थ आणि इतर गरजेचे साहित्य याची विक्री करण्यात येते. यातून सकाळी आणि रात्री या दुकानांवर होणारी गर्दी इतर वाहनधारकांना त्रासदायक ठरत आहे. दुसरीकडे रुग्णालयात दर दिवशी २०० पेक्षा अधिक दुचाकी वाहने आणि ५० च्या जवळपास खाजगी चारचाकी वाहने येतात. ही वाहने थेट रुग्णालयाच्या पार्किंग लाॅटमध्ये जातात. यातून वाहतूकीची कोंडी होते. याच ठिकाणी जिल्हा रुग्णालयाने पार्किंग अर्थात वाहनतळ तयार करण्याचे नियोजन केले होते. तसे, पत्र सहा वर्षांपूर्वी बांधकाम विभागाला देण्यात आले होते. परंतू बांधकाम विभागाने त्याची दखल घेतली नाही. यानंतर आणखी एकवेळा याबाबत माहिती देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. परंतू त्यावरही योग्य ती कावाई झालेली नाही. दिवसेंदिवस याठिकाणी वाढती गर्दी, बाहेर उभ्या राहणा-या रिक्षा यामुळे वाहतूक कोंडी होवून रुग्णवाहिकांना अडसर निर्माण होत आहे. यातून येणा-या-जाणा-यांना अडचणीचे ठरत आहे.

  • आपत्कालीन मार्ग बंद करुन दोन प्रवेशद्वारांचा होतोय वापर 
  •  जिल्हा रुग्णालयातून बाहेर पडण्यासाठी आणि आत जाण्यासाठी दोन प्रवेशद्वार आहेत. परंतू बहुतांश रुग्णवाहिका ह्या मुख्य प्रवेशद्वाराने अपघात विभागाकडे जातात. 
  • कोरोना वाॅर्डकडे जाणा-या रुग्णवाहिका केवळ दुस-या प्रवेशद्वाराने जातात. येथील तिसरे प्रवेशद्वार मात्र रुग्णालय प्रशासनाने बंद ठेवले आहे.  
  • आतापर्यंत माॅकड्रील नाहीचजिल्हा रुग्णालयातून बाहेर पडण्यासाठी तीन प्रवेशद्वारे आहेत. यातून आपत्कालीन स्थितीत बाहेर येण्यास जागा असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. यातून माॅकड्रील केलेले नाही. याउटल रुग्णवाहिकांना मार्ग व्हावा म्हणून सध्याचे वाहनतळ मोकळे करण्याचा निर्णय घेतला आहे.