शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
2
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
3
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
6
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
7
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
8
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
9
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
10
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
11
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
12
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
13
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
14
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
15
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
16
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
17
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
18
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
19
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
20
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिबंधीत रस्त्यांवरून वाहनांची ये-जा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 12:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गणेशोत्सव काळात मोठा मारुती ते जळका बाजार आणि सोनार खूंट ते साक्री नाका या ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गणेशोत्सव काळात मोठा मारुती ते जळका बाजार आणि सोनार खूंट ते साक्री नाका या रस्यांवर तीन व चारचाकी वाहनांना प्रवेश बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला असतांनाही त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या रस्त्यांवर वारंवार वाहतूक ठप्प होत असते. पोलीसांनीच त्यांच्या विभागाच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचा हा प्रकार असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.
गणेशोत्सवाच्या काळात शिवाजीरोड आणि टिळक रोडवर मोठ्या प्रमाणावर रहदारी खोळंबते. शिवाजीरोड ते मोठा मारुती मंदीरापर्यंतच्या रस्त्यावर दादा गणपती तसेच इतर मोठ्या मंडळांचे गणपती आहेत. शिवाय टिळक रोड ते साक्रीनाका दरम्यान बाब गणपती व इतर मंडळांचा गणपती आहे. त्यामुळे या काळात या मार्गावर तीन व चारचाकी वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली होती. तसा अधिकृत आदेश पोलीस अधीक्षकांनी २० आॅगस्ट रोजीच काढला होता.
या भागात ध्वनीक्षेपकाद्वारे नागरिकांना सुचीतही करण्यात आले होते. असे असतांनाही पहिल्या दिवसापासून या आदेशाचे पालनच झाले नसल्याचे चित्र आहे. सर्रास चार चाकी वाहने व तीन चाकी प्रवासी वाहने या रस्त्यांवरून ये-जा करतात.
वाहतूक पोलिसांची ड्युटी या भागात लावणे आवश्यक असतांना वाहतूक पोलीस शहराच्या चारही बाजुंच्या रस्त्यांवर उभे राहून आपल्या टार्गेटसाठी दंडाच्या पावत्या फाडण्यात व्यस्त असतात. त्यामुळे पोलीस उपअधीक्षकांच्या आदेशाला त्याच्याच विभागाने जुमानले नसल्याच्या प्रतिक्रिया शिवाजीरोड आणि टिळक रोडवरील नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.
आता किमान गणेशोत्सवाच्या शेवटच्या पाच दिवसात तरी या आदेशाची कडक अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा शहरवासीयांमधून तसेच या भागातील गणेश मंडळ कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.