शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

नवापुरच्या विलगीकरण कक्षात सुविधांमुळे दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : विलगीकरणासाठी शहरात सुरू करण्यात आलेल्या दोन्ही ठिकाणी जेवणासह इतर सुविधा समाधानकारकरित्या देण्यात येत असल्याचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : विलगीकरणासाठी शहरात सुरू करण्यात आलेल्या दोन्ही ठिकाणी जेवणासह इतर सुविधा समाधानकारकरित्या देण्यात येत असल्याचे दिसून आले. दोन्ही ठिकाणी ४७ जण तर होम क्वॉरंटाईन केलेल्यांची तालुक्यातील संख्या तीन हजार ८५५ आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वरिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचे व मुलींचे वसतिगृहात पुरुषांची तर जयहिंद छात्रालयात महिलांसाठी विलगीकरणाची सोय करण्यात आली आहे. ‘लोकमत’कडून या कक्षात मिळणाऱ्या सोयी-सुविधांचा आढावा घेण्यात आला़ वरिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृहात १६ जण व मुलींचे वसतिगृहात सात जण विलगीकरण कक्षात होते. दोन्हींसाठी तीन वैद्यकीय अधिकारी तेथे हजर दिसून आले. सकाळचा नाश्ता, दोन वेळचा चहा व दोन्हीवेळचे जेवण अगदी वेळेवर व चांगल्या दर्जाचे देण्यात येत असल्याचे दिसून आले. विलगीकरण कक्षात दर आठवड्याला पालिकेकडून ओषध फवारणी करण्यात येत असल्याचेही समोर आले. जयहिंद छात्रालयात युवती व महिला मिळून २४ जण आहेत. तेथेही सोयी सुविधा तशाच आढळून आल्या. उपविभागीय अधिकारी वसुमना पंत यांच्या गेल्या आठवड्यातील विलगीकरण केंद्रास झालेल्या भेटीनंतर याठिकाणी मनोरंजनासाठी टी.व्ही. संचही उपलब्ध झाल्याने कक्षातील महिलांना सोयीचे झाल्याचे दिसून आले. तालुक्यात इतरत्र ठिकाणाहून आलेले एकूण तीन हजार ८५५ जण होम क्वारंटाईन आहेत. त्यांचे कार्यालयीन सोपस्कार आरोग्य विभागाने पार पाडले आहेत. संस्थात्मक व खाजगी स्तरावर विलगीकरण केलेल्या कुणासही सर्दी व इतर लक्षणे दिसून आलेले नाही ही समाधान देणारी बाब असल्याचे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी सांगितले.येथील सीमा तपासणी नाक्यावर कर्तव्यावर असलेल्या एक आरोग्य सहायक धुळे शहरातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतरही प्रशासनास न कळवता कर्तव्यावर हजर झाला होता. ही बाब उघडकीस आल्याने त्याचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. त्याचा अहवाल नकारात्मक आल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. ठरलेल्या कालावधीत त्या आरोग्य सहायकाचे स्वॅब दुसऱ्यांदा घेतले जाणार असल्याने त्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातच त्याला ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. ज्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासमवेत तो कर्तव्यावर हजर होता अशा १५ जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. त्यात एका सहायक पोलीस निरीक्षक, १० पोलीस कर्मचारी व पाच आरोग्य कर्मचारी असे एकूण १६ अधिकारी व कर्मचाºयांचा समावेश होता.वैद्यकीय अधिकाºयांच्या चेहºयावर समाधान४पुरुषांच्या विलगीकरण कक्षात कर्तव्यावर उपस्थित तीनपैकी दोन व जिल्ह्यातील इतर आठ असे एकूण १० वैद्यकीय अधिकाºयांना मालेगाव येथे प्रतिनियुक्तीवर पाठविण्याचा निर्णय झाला होता. मालेगावच्या परिस्थितीविषयी येणारे वृत्त व जिल्ह्यातील आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी सतत कामावर हजर राहून कर्तव्य पार पाडणारे वैद्यकीय अधिकारी मालेगाव येथे जाण्यास उत्सुक नव्हते. त्या दहाही वैद्यकीय अधिकाºयांचे मालेगाव येथे जाणे रद्द झाल्याचा निर्णय जिल्हास्तरावरुन झाल्याने त्याचा आनंद नवापूर येथील केंद्रावर उपस्थित एका अधिकाºयाच्या चेहºयावर स्पष्टपणे झळकत होता.