शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

चला चला, ऑक्सिजन सिलिंडरची गाडी आली..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:30 IST

नंदुरबार : पाण्याच्या टंचाईग्रस्त गावात पाण्याचे टँकर आल्यानंतर पाणी भरण्यासाठी अख्ख गाव तुटून पडतं हे चित्र आपण नेहमीच अनुभवले ...

नंदुरबार : पाण्याच्या टंचाईग्रस्त गावात पाण्याचे टँकर आल्यानंतर पाणी भरण्यासाठी अख्ख गाव तुटून पडतं हे चित्र आपण नेहमीच अनुभवले आहे. आता तसेच चित्र ऑक्सिजन सिलिंडरच्या गाडीबाबत झाले आहे. बुधवारी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात ही गाडी येऊन उभी राहत नाही, तोच रुग्णांचे नातेवाईक या गाडीतील सिलिंडर पळविण्यासाठी अक्षरश: तुटून पडले.

नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. सध्या जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या आठ हजारांच्या आसपास पोहोचली आहे. त्यातच मृत्यूचे प्रमाण वाढले असून, चार दिवसांत ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. रुग्णांना वाचविण्यासाठी त्यांचे नातेवाईक वाट्टेल ते करण्यास तयार झाले आहेत. विशेषत: रेमडिसीवर इंजेक्शन मिळविण्यासाठी आणि रुग्णालयात बेड मिळविण्यासाठी नातेवाइकांना प्रचंड कसरती कराव्या लागत आहे. त्यातच जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन सिलिंडर पळविण्याचे चित्र मन सुन्न करणारे आहे.

नंदुरबार जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र ऑक्सिजन प्रकल्प असून, त्याद्वारे रोज २५० सिलिंडर ऑक्सिजन तयार होतो. मात्र, वाढत्या रुग्णांमुळे ते कमी पडत असल्याने रोज धुळ्याहून १५० सिलिंडर मागविले जातात. हे सिलिंडर एका मोठ्या व्हॅनमध्ये भरून येतात. बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास ही व्हॅन येऊन उभी राहत नाही तोच त्याच्या प्रतीक्षेत असलेले कोरोना रुग्णांचे नातेवाईक अचानक व्हॅनभोवती गोळा झाले आणि व्हॅनमधून थेट सिलिंडर घेऊन आपले रुग्ण ज्याठिकाणी उपचार घेत आहे त्या दिशेने तब्बल ५० किलोपेक्षा अधिक वजनाचे सिलिंडर उचलता येत नसले तरी ओढून घेऊन जात होते. सिलिंडर घेण्यासाठी चढाओढ झाल्याने जोरजोरात आरडाओरड सुरू झाली. रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या ते लक्षात येताच त्यांनी मध्यस्थी करून कसे तरी हा गोंधळ थांबविला. तोपर्यंत गाडीतील निम्म्यापेक्षा अधिक सिलिंडर नातेवाइकांनी पळवून आपला रुग्ण ज्या बेडवर उपचार घेत आहे त्याखाली ठेवले.

जिल्हा रुग्णालयात सध्या ऑक्सिजन बेडवर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १३० पेक्षा अधिक आहे. जवळपास १०० बेडवर व्हाॅल्वद्वारे ॲटोमेटीक ऑक्सिजनचा पुरवठा होतो. इतर बेडसाठी मात्र, थेट सिलिंडर लावून ऑक्सिजन पुरवठा होतो. सध्या रुग्णांना ऑक्सिजन मोठ्या प्रमाणावर लागत आहे. एका रुग्णाला साधारणत: दर मिनिटाला १५ ते ६० लिटर ऑक्सिजनची गरज भासत आहे. काही रुग्णांचे प्रमाण त्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे जर रुग्णाला लावलेला सिलिंडर संपला तर दुसरा उपलब्ध होईल की नाही अशी रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना भीती आहे. त्यामुळे गाडी येताच आपला सिलिंडर आधीच मिळवून तो आपल्या ताब्यात घ्यावा यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांचा प्रयत्न असतो. काही जणांनी तर आधीच दोन-तीन सिलिंडर ताब्यात घेतल्याचे दिसून आले.

प्रत्येक रुग्णाला योग्य उपचार व ऑक्सिजन देण्याचे नियोजन असून, आजवर ऑक्सिजन मिळाला नाही असा प्रकार येथे घडलेला नाही. बुधवारी मात्र चुकीचे चित्र पाहायला मिळाले. याची गंभीर दखल घेतली असून, योग्य नियोजन केले आहे. रुग्णालयातील प्रत्येक रुग्णाला चांगल्या पद्धतीने सेवा देण्याचा रुग्णालय प्रशासनाचे प्रयत्न आहेत.

डाॅ. के. डी. सातपुते, निवासी जिल्हा शल्य चिकित्सक, नंदुरबार.