नंदुरबार रेल्वे स्थानकांत आओ जाओ घर तुम्हारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:22 IST2021-07-01T04:22:04+5:302021-07-01T04:22:04+5:30

महाराष्ट्र व गुजरात सीमेवरील मध्यस्थानी असलेल्या नंदुरबार रेल्वे स्थानक सार्वजनिक ठिकाणी डेल्टा आजार संक्रमण होण्याची दाट शक्यता असताना रेल्वे ...

Come and go to Nandurbar railway station, your home | नंदुरबार रेल्वे स्थानकांत आओ जाओ घर तुम्हारा

नंदुरबार रेल्वे स्थानकांत आओ जाओ घर तुम्हारा

महाराष्ट्र व गुजरात सीमेवरील मध्यस्थानी असलेल्या नंदुरबार रेल्वे स्थानक सार्वजनिक ठिकाणी डेल्टा आजार संक्रमण होण्याची दाट शक्यता असताना रेल्वे प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात नसल्याने कोरोना आजार संक्रमित होण्याची भीती प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे. जिल्ह्याच्या केंद्रस्थानी व गुजरात-महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर रेल्वे स्थानक असून येथून अमळनेर, जळगाव, भुसावळ या मार्गांकडे उत्तर महाराष्ट्रामधील प्रवासी ये-जा करतात. तर, गुजरात राज्यातील बारडोली, सुरत, बडोदा, अहमदाबाद या मार्गावरील प्रवासी रेल्वेतून प्रवास करतात.

रेल्वे स्थानकांत विनामास्कवर कार्यवाही होणार का?

रेल्वे स्थानकांत प्रवासी, खाद्यपदार्थ विक्री करणारे दुकानदार व कामगार, रेेल्वे प्रशासनातील कर्मचारी व रेल्वे पोलीस दलातील कर्मचारी मास्क लावत नसून शासन नियमाबाबत निष्काळजीपणा करताना दिसून येत आहे. त्यामुळे मास्क न लावणाऱ्यांवर कार्यवाही करणार कोण, असा प्रश्न निर्माण होत आहे. रेल्वे स्थानक प्रवेशद्वाराजवळ हात निर्जंतुक करण्यासाठी सॅनिटायझर व ताप मोजणे आवश्यक असताना तपासणी न करता प्रवाशांना स्थानकांत सोडले जात असल्याचे चित्र आहे.

Web Title: Come and go to Nandurbar railway station, your home