शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

फार्मसी कॉलेजच्या शिक्षकांचे कोरोनावर संशोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 12:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील जिजामाता शिक्षण संस्थेच्या औषधनिर्माणशास्त्र पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापक यांनी कोविड-१९ या विषाणूवर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील जिजामाता शिक्षण संस्थेच्या औषधनिर्माणशास्त्र पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापक यांनी कोविड-१९ या विषाणूवर केलेला संशोधनात्मक लेख एशियन जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे़ वनस्पतींच्या आधाराने कोरोनावर मात करणे शक्य असल्याचे या लेखात मांडले आहे़महाविद्यालयाचे प्रा़ राकेश एऩ चौधरी व सहलेखक प्राचार्य रविंद्र एस़ चौधरी या दोघांनी कोरोना व्हायरसवर संशोधन करुन त्यावर लेख लिहिला होता़ ‘सायटोस्टेरोल आयसोलेशन फ्रॉम म्यूनेटींजिया कालाबुरा लिन बार्क एक्सट्रॅक्ट स्ट्रक्टचरल एल्युसिडेशन मॉलेक्यूर डॉकिंग स्टडीज अ‍ॅस पोटेंशियल इनहीबीचॉर सार्स कोव्हीड एमप्रो’ या शिर्षकाचा हा लेख आहे़ यातून दोघांनी वनस्पतींचा आधार घेत रुग्णांची रोग प्रतिकारक शक्ती कशा प्रकारे वाढवता येऊ शकते याची मांडणी केली आहे़प्रा़ राकेश चौधरी यांना प्राचार्य डॉ़ आऱएस़चौधरी व शाहरुख खान या दोघांचे सहकार्य लाभले़ एशियन जर्नल आॅफ फार्मास्युटिकल्स अँड क्लिनिकल रिसर्चचे डॉ़ अनुरेख जैन यांनी याबाबत दोघांना पत्र पाठवले आहे़जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे़ रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयामार्फत जनजागृतीचे काम होत आहे़ त्यातच प्रा़ चौधरी यांच्या लेखातून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी जमैकन पेरी, पनामा बेरी, सिंगापूर चेरी या वनस्पतींचा आधार लेखातून घेतला गेला आहे़ कोरोनाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने हा लेख लिहिला असल्याची माहिती प्रा़ राकेश चौधरी यांनी दिली आहे़कोरोना फेवीपिरावोर ह्या बायोलॉजिकल औषधाची क्षमता जास्त असल्याने रुग्ण लवकर बारा होण्यास मदत होईल असे त्यांनी सिद्ध केले आहे़ प्रा़ चौधरी यांच्यासह प्राचार्य आऱएस़चौधरी व प्रा़ शाहरुख खान यांचे संस्थेच्या अध्यक्षा शोभा मोरे, उपाध्यक्ष डॉ़ विक्रांत मोरे, सचिव डॉ़ अभिजीत मोरे यांनी कौतूक केले आहे़