शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

केदारेश्वर मंदिर परिसरात साफसफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 12:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील केदारेश्वर मंदिर परिसर पंपाद्वारे सॅनिटायझर करण्यात आला. भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिराच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील केदारेश्वर मंदिर परिसर पंपाद्वारे सॅनिटायझर करण्यात आला. भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ स्वयंचलित सॅनिटायझर फवारणी यंत्र बसविण्यात येणार असून त्याची तयारी सुरू आहे.प्रकाशा हे दक्षिणकाशी तीर्थक्षेत्र म्हणून भारतात प्रसिद्ध आहे. येथे भारतभरातून भाविक श्रद्धेने दर्शनासाठी येतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आल्याने मंदिर बंद आहे. प्रकाशा परिसरात एकही कोरोना रुग्ण अद्याप आढळून आला नाही. म्हणून काही अटीशर्तीवर केदारेश्वर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात यावे, अशी मागणी मंदिराचे मुख्य विश्वस्त रामचंद्र पाटील, पुजारी व भाविकांनी केली आहे.मंदिर खुले करण्यासाठी पूर्वतयारीसाठी केदारेश्वर मंदिराचे मुख्य ट्रस्टी रामचंद्र पाटील, सदस्य तुकाराम पाटील, गजानन भोई, रमेश साळी, गुरव पुजारी गोरख गुरव, रवींद्र गुरव, रामचंद्र गुरव, गोकूळ गुरव, नरेंद्र गुरव, नीलेश गुरव, दीपक देशपांडे आदींनी चर्चा केली. मंदिर खुले करण्यासाठी दर्शनासाठी परवानगी मिळेल तेव्हा मिळेल मात्र त्याआधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आतापासून उपयोजना करणे गरजेचे आहे. त्यानुसार केदारेश्वर मंदिराचा परिसर साफसफाई करून संपूर्ण मंदिराला सॅनिटायझर करण्यात आले. तसेच भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांची सुरक्षा व्हावी म्हणून केदारेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर स्वयंचलित सॅनिटायझर फवारणी यंत्र बसवण्यासाठी तयारी सुरू आहे. मंदिराच्या ट्रस्टींच्या उपस्थितीत हे स्वयंचलित यंत्र कुठे कार्यान्वित करावे याबाबत जागा ठरवून चर्चा करण्यात आली. मंदिरातील सर्व घंटा कापडाने बांधून देण्यात आल्या. जेणेकरून कळत-नकळत त्याला कोणाचे हात लागू नये. ८० दिवसांपासून मंदिर बंद अवस्थेत होते म्हणून आज मंदिर व सभा मंडपात स्वच्छता करून साफसफाई करण्यात आली.शासनाच्या परवानगीनंतर प्रकाशा येथील केदारेश्वर मंदिरासह इतर मंदिरे व परिसर साफसफाई करून दर्शनासाठी खुली करण्यात येणार आहेत.राज्य शासनाने मंदिर उघडण्यास बंदी केली आहे. मात्र त्याआधीच मंदिराबाहेर स्वयंचलित सॅनिटायझर फवारणी यंत्र बसवण्यासाठी मोजमाप करण्यात आले. ८० दिवसांपासून मंदिर बंद आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी अटीशर्तीवर प्रकाशा येथील केदारेश्वर मंदिर उघडण्यासाठी परवानगी द्यावी.-रामचंद्र दशरथ पाटील, मुख्य विश्वस्त, केदारेश्वर मंदिर ट्रस्ट, प्रकाशा.