आगारात बसेसच्या स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 12:31 IST2020-03-18T12:30:54+5:302020-03-18T12:31:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बसस्थानकात बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून कोरोनाची लागण होऊ नये यासाठी नंदुरबार आगाराकडून बसेसची स्वच्छता ...

Cleaning of buses in Agar | आगारात बसेसच्या स्वच्छता

आगारात बसेसच्या स्वच्छता

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : बसस्थानकात बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून कोरोनाची लागण होऊ नये यासाठी नंदुरबार आगाराकडून बसेसची स्वच्छता करण्यासह सॅॅनेटायझरचा वापर करण्यात येत आहे़ यातून प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरु आहे़
कोरोनाचा परिणाम दैनंदिन सार्वजनिक व्यवस्थेवरती परिणाम झाला असून नंदुरबार बसस्थानकावर प्रवाशांची तुरळक गर्दी आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आगारातर्फे सर्व बसेस दररोज आतून-बाहेरून स्वच्छ धुण्यावर भर दिला जात आहे. स्वच्छतेसाठी कार्यशाळेतील महिला आणि पुरुष सफाई कामगार यांची नियु्क्ती करण्यात आली आहे़ त्यांच्याकडून फवारणी मशीनच्या टाकीत डेटॉल आणि वॉशिंग पावडर टाकून त्या पाण्याने बसेसची स्वच्छता केली जात असल्याची माहिती आगार प्रमुख मनोज पवार यांनी दिली. जिल्ह्यात शाळा, महाविद्यालय बंद झाल्याने तसेच शासकीय कामानिमित्त नागरिकही येत नसल्याने आगाराच्या उत्पन्नावर परिणाम जाणवत आहे़
दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून नंदुरबार आगारातून पुणे आणि मुंबई दोन्ही बसेस सध्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच ग्रामीण भागातील मुक्कामी फेºया आणि मानव विकास अंतर्गत होणाºया २४० शालेय फेºया थांबविण्यात आले आहेत. वाहक चालक आणि एसटी कर्मचाऱ्यांना धुळे विभागाकडून मास्क आणि सनेटाइजरचे बुधवारपासून वाटप करण्यात येणार आहे़ याबाबत आगार प्रमुख मनोज पवार यांनी एसटीच्या स्वच्छतेसह कर्मचाºयांसाठी सुविधा देण्यावर भर देत असल्याची माहिती दिली आहे़

Web Title: Cleaning of buses in Agar