शहरं
Join us  
Trending Stories
1
“कुणालाही पाठीशी घालू नका”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी CM एकनाथ शिंदेंचे पोलिसांना निर्देश
2
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
3
Arvind Kejriwal : "देशातील लोक पाकिस्तानी आहेत का?"; अरविंद केजरीवालांचा अमित शाहांवर पलटवार
4
आएगा तो मोदी...! भाजपाला किती जागा मिळणार?; प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी
5
ही दोस्ती तुटायची नाय...! एकत्र केली UPSC तयारी; दोघं IAS तर एक मित्र IPS बनला
6
Veritaas Advertising IPO: लिस्ट होताच शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, ₹१४४ चा शेअर पोहोचला ₹२८८ वर; गुंतवणूकदार मालामाल
7
...म्हणूनही मला संघात घेतलं नव्हतं; Gautam Gambhir चा खळबळजनक खुलासा
8
सावधान! RTO ने नियम बदलले, १ जूनपासून लागू होणार नवे रुल्स;...तर भरावा लागेल २५ हजारांचा दंड
9
काँग्रेस, आप दुफळीत भाजपचा मोठा फायदा; ना नेत्यांची, ना कार्यकर्त्यांची मने जुळली
10
'आता मी कोणाचाच प्रचार करणार नाही कारण...' अलका कुबल यांनी मांडलं स्पष्ट मत
11
“RSS चा स्वयंसेवक होतो, पुन्हा संघटनेत काम करायला तयार आहे”; हायकोर्ट जजने थेट सांगितले
12
कतरिना कैफही आहे गरोदर? ओव्हरकोट ड्रेसमध्ये दिसला बेबीबंप; नवऱ्यासोबत लंडनमध्ये फेरफटका
13
कलम ३७० हटल्यानंतर नवा रेकॉर्ड बनला; दहशतवाद्यांचा गड उद्ध्वस्त करून लोकशाही अवतरली
14
'कोर्टाने आमचे दोन्ही अर्ज फेटाळले'; पोलिसांवरील आरोपांनंतर पोलीस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
15
वडिलांना वाढदिवसाचे सरप्राइज द्यायचे राहिले, त्या आधीच देवाने...! ससूनच्या शवागारात आईचा आक्रोश
16
...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा
17
'बाबा, तुमची स्वप्ने, माझी स्वप्ने', राजीव गांधींच्या पुण्यतिथीला राहुल गांधी झाले भावूक, जुना फोटो केला शेअर
18
"दोन मुडदे पडले असताना तुम्ही त्याला पिझ्झा खायला घालता"; पुणे पोलीस आयुक्तांवर संतापले संजय राऊत
19
“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
20
₹३३९ वरून ₹४८३० वर पोहोचला 'या' सरकारी कंपनीचा शेअर, PM मोदींनीही केलेला उल्लेख 

शहादा तालुक्यात निकालानंतर रंगताहेत दावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 1:43 PM

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला आहे. तालुक्यात एकूण २७ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला आहे. तालुक्यात एकूण २७ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. यातील सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने २१ ग्रामपंचायतींत मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. २७ ग्रामपंचायतींपैकी सर्वाधिक आठ ग्रामपंचायती या जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती अभिजित पाटील यांच्या गटाने जिंकल्या आहेत. सात राष्ट्रवादी काँग्रेसने तर भारतीय जनता पक्षाने पाच ग्रामपंचायतींवर झेंडा फडकविला आहे.तहसील कार्यालयात सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास मतमोजणीला सुरुवात झाली होती. निकाल ऐकण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने आले होते. जसेजसे निकाल घोषित होऊ लागले, तसतसे आत असलेले उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर बाहेरही जल्लोष सुरू होता. मतमोजणीदरम्यान तालुक्यातील कु-हावद तर्फे सारंगखेडा ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक १ मधील रेखाबाई अशोक कुवर व सोनिया विनोद कुवर या दोन्ही महिला उमेदवारांना प्रत्येकी ६९ अशी सारखी मते पडल्याने ईश्वर चिठ्ठी काढण्यात येऊन निकाल जाहीर करण्यात आला. निरीक्षक वसुमाना पंत, तहसीलदार डाॅ. मिलिंद कुलकर्णी यांच्या उपस्थितीत रियांश नायक या लहान बालकाने सोनिया विनोद कुवर यांच्या नावाची चिठ्ठी काढल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. तालुक्यातील बामखेडा तर्फे सारंगखेडा, वर्ढे तर्फे शहादा, कौठळ तर्फे सारंगखेडा, कु-हावद तर्फे सारंगखेडा, असलोद, शेल्टी, कानडी तर्फे शहादा या सात ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या असल्याचा दावा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष हेमलता शितोळे यांनी केला आहे. तर, तालुक्यातील कोटबांधणी, नागझिरी, असलोद, न्यू असलोद व मोहिदा तर्फे शहादा या पाच ग्रामपंचायती आमदार राजेश पाडवी, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने जिंकल्या असल्याचा दावा करण्यात आला आहे. तापी पट्ट्यातील पुसनद, बामखेडा, कुकावल, कानडी, मनरद फेस, टेंभा अशा सात ग्रामपंचायती जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढविलेल्या पॅनलने जिंकल्या असल्याचा दावा यांच्यातर्फे करण्यात आला आहे. सभापती पाटील हे काँग्रेसचे पदाधिकारी असल्याने या ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात असल्याचे बोलले जात आहे. बहुचर्चित सारंगखेडा ग्रामपंचायतीवर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयपालसिंह रावल यांचा करिष्मा पुन्हा सिद्ध झाला असून त्यांच्या गटाने १७ पैकी १७ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला, तर पराभूत उमेदवार व त्यांचे समर्थक हताशपणे मतमोजणी केंद्राच्या बाहेर पडले. मतमोजणीसाठी प्रशासनातर्फे आठ टेबलांची व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहायक व संबंधित ग्रामपंचायतीचे निवडणूक निर्णय अधिकारी अशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. शहादा तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता उमेदवार अथवा त्यांचा एक प्रतिनिधी यांनीच उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आल्याने मतमोजणीसाठी प्रभागनिहाय उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी अशा मोठ्या लोकांना प्रवेश दिला जात होता. तहसील कार्यालय परिसरात मतमोजणीसाठी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. उपविभागीय पोलीस अधीक्षक श्रीकांत घुमरे, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक तथा प्रभारी पोलीस निरीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचारी तहसील आवारात तैनात होते. 

   तहसीलमध्ये गर्दी  निकाल ऐकण्यासाठी ग्रामीण भागातून उमेदवार व प्रतिनिधींची सकाळपासून तहसील कार्यालय परिसरात गर्दी होती. निकालाची घोषणा झाल्यानंतर विजयी उमेदवार गुलालाची उधळण करत होते. तहसील कार्यालयाचा सभागृहात तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मिलिंद कुलकर्णी यांच्या उपस्थितीत प्रत्येक टेबलावर चार कर्मचारी असे आठ टेबलांवर तीन फेऱ्यामध्ये  मतमोजणी झाली. पावणे तीन तासात संपूर्ण निकाल जाहीर झाला. यावेळी प्रत्येक गावात नेमून दिलेले निवडणूक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

   आठ फे-यांकडे लक्ष मतमोजणीच्या एकूण आठ फेऱ्या झाल्या. पहिल्या फेरीत कोठलीतर्फे सारंगखेडा, टेंभेतर्फे सारंगखेडा, टेंभेतर्फे शहादा, फेस, नागझिरी, कवठळतर्फे सारंगखेडा, मनरद, कानडीतर्फे शहादा, पुसनद आदी गावांचा समावेश होता. दुसऱ्या फेरीत शेल्टी, कुकावल, कोटबांधणी, कुऱ्हावदतर्फे सारंगखेडा, बामखेडातर्फे तऱ्हाडी, कुऱ्हावदतर्फे सारंगखेडा, बामखेडा, डामरखेडा, राणीपूर, सोनवद आदी. तिसऱ्या फेरीत असलोद, सारंगखेडा, मोहिदेतर्फे शहादा, तोरखेडा आदींचा समावेश होता. दुस-या फेरीतील सारंगखेडा ग्रामपंचायतीच्या निकालानंतर रावल समर्थकांचा जल्लोष सुरु होता. 

पहिला निकाल निकाल टेंभे गावचा : तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींचा निकाल अवघ्या दीड तासात जाहीर करण्यात आला. सकाळी १० वाजता सर्वांत प्रथम टेंभे तर्फे सारंगखेडा ग्रामपंचायतीचा निकाल केवळ दोन फेऱ्यांमध्ये जाहीर झाला. यानंतर उर्वरित २० ग्रामपंचायतींचे निकाल झाले आहेत.

एका मताने पराभव झाल्याने खंत  शेल्टी ग्रामपंचायत मधील प्रभाग क्रमांक १ मधील उमेदवार देविदास शिवदास  भिल ३१८ तर महेंद्र मोहन मुसळदे यांना ३१७ मते मिळाली. पुसनद ग्रामपंचायत मधील प्रभाग क्रमांक ३ मधील शरद बाबू पाटील १९२ तर विनोद चिंतामण पाटील यांना १९१ मते मिळाली आहेत वरिल दोन्हीं ग्रामपंचयात मधील दोन्हीं उमेदवारांना प्रत्येकी एक-एक मतांनी पराभव स्वीकारावा लागला असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी खंत व्यक्त केली आहे.