शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा शहरातही मुंबई मार्गानेच झाला कोरोनाचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार/तळोदा : शहरातील एकास कोरोनाचा संसर्ग झाला आहे़ संसर्ग झालेला रुग्ण दोन दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या वृद्ध ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार/तळोदा : शहरातील एकास कोरोनाचा संसर्ग झाला आहे़ संसर्ग झालेला रुग्ण दोन दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचा मुलगा असून त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर मोठा माळीवाडा कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे़ दरम्यान मयत महिला ठाणे येथून परतली असल्याने तळोद्यातही मुंबई मार्गानेच कोरोना आल्याचे स्पष्ट झाले आहे़५ जून रोजी ठाणे येथून ७२ वर्षीय महिला कुटुंबासह तळोद्यात परतली होती. या महिलेला कोरोनासदृश लक्षणे होती. त्यातच तिचा शुक्रवारी मध्यरात्री मृत्यू झाला होता. आरोग्य व महसूल विभागाला ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने येथे धाव घेत मयत महिलेचे नातलग आणि संपर्कात आलेल्या १४ जणांना आमलाड येथे क्वारंटाईन कक्षात हलवले होते़ दरम्यान मयताच्या ४० वर्षीय मुलाचा स्वॅब घेण्यात येऊन तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला होता़ या स्वॅबचा अहवाल सोमवारी सायंकाळी प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाने मोठा माळीवाडा परिसर सील करुन आवश्यक ती फवारणी करुन पाहणी केली़ पालिकेच्या आरोग्य विभागाने ही फवारणी केली़ प्रशासनाकडून तातडीने हा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहिर करण्यात आला आहे़ आरोग्य विभागाने संध्याकाळीच घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरु केला होता़ मयत वृद्ध महिलेवर उपचार करणाऱ्या दोघा डॉक्टरांनाही दवाखाने बंद करण्याच्या सूचना वैद्यकीय यंत्रणेने दिल्या आहेत. पॉझिटिव्ह म्हणून समोर आलेल्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यात येत असून रात्री उशिरापर्यंत माहिती घेतली जात होती़ उपजिल्हाधिकारी अविशांत पंडा, तहसीलदार पंकज लोखंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ़ महेंद्र चव्हाण, मुख्याधिकारी सपना वसावा, पोलिस निरीक्षक राजेश शिंगटे, पालिकेचे प्रभारी आरोग्य निरीक्षक अश्विन परदेशी हे रात्री उशिरापर्यंत या भागात तपासणी करत होते़नागरिकांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे़ रात्री उशिरापर्यंत अधिकारी मोठा माळीवाडा भागात नागरिकांची भेट घेऊन त्यांना दिलासा देत जनजागृती करत होते़सर्वत्र कोरोनाचे रुग्ण आढळून येत असताना तळोद्यात एकही रुग्ण आढळून आला नव्हता़ महसूल, आरोग्य, पालिका आणि पोलीस प्रशासनाने यासाठी मेहनत घेतली होती़ परंतू ठाणे येथून परतलेल्या कुटूंबामुळे तळोद्यातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे़ यामुळे नागरिकांमध्ये चिंता आहे़ बाहेरगावाहून शहर अथवा तालुक्यात येणाऱ्यांनी संपर्क करण्याचे आरोग्य विभागाने कळवले आहे़ तालुका वैद्यकीय अधिकारी महेंद्र चव्हाण यांच्यासह आरोग्य पथक मोठा माळीवाडा भागात उशिरापर्यंत सर्वेक्षण करत होते़