शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

मुलभूत सोयींअभावी नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 12:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील प्रभाग क्रमांक पाचमधील रस्ते, गटारी व खुल्या जागा विकसित करून नागरी सुविधा उपलब्ध ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील प्रभाग क्रमांक पाचमधील रस्ते, गटारी व खुल्या जागा विकसित करून नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अन्यथा नागरी आंदोलन उभारले, जाईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे. यासंदर्भात पालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.शहरात पालिकेतर्फे विकास कामे करण्यात येत आहेत. प्रभाग पाचमधील निवडक भागातच रस्ते, गटारी आणि खुल्या जागेचा विकास करण्यात आला. उर्वरीत भागाकडे मात्र दुर्लक्ष केल्याने येथील नागरिकांना असुविधेचा सामना करावा लागत आहे. या भागात पालिका प्रशासनाने त्वरीत लक्ष केंद्रीत करून रस्ते, गटारी व खुल्या जागेचा विकास करण्याची मागणी निवेदनात केली आहे. प्रभाग क्रमांक पाचमधील पतंजलीनगर सर्वे नं.२०/१ येथील रहिवासी नगरपरिषदेचे सर्व प्रकारचे कर वेळेवर नियमित भरतात. पतंजलीनगर हे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असूनही सोयीसुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अद्याप या भागातील रस्त्यांचे डांबरीकरणही झालेले नाही. त्यामुळे रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. रस्ते नसल्याने पावसाळ्यात ठिकठिकाणी डबके साचत्ून डासांचा प्रादुर्भाव वाढतो. गटारींची सोय नसल्याने सांडपाण्याचाही गंभीर प्रश्न उद्भवला आहे. दुर्गंधीचे वातावरण तयार झाल्याने नागरिकांना रोगराईचा सामना करावा लागतो. त्याचप्रमाणे या परिसरातील खुल्या जागेची दुरवस्था झाली आहे. या खुल्या जागेचा रहिवाशांना कुठलाही उपयोग होत नाही. या खुल्या जागेवर नगरपालिकेमार्फत विकास करून दिल्यास नागरिकांना त्याचा वापर करता येईल. नगरपरिषदेकडून वरील समस्यांचे त्वरित निराकरण करून विकास कामे करताना कोणताही भेदभाव न करता करावे अन्यथा नागरीकांतर्फे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर मिलिंद चौधरी, राजेश राठोड, प्रविण सूर्यवंशी, भिमराव मोरे, लक्ष्मण अहिरे, दीपक भोई, जयपालसिंग पवार, विजय निकम, सुरेश सैंदाणे, भावेश पाटील, राकेश जायस्वाल, वासुदेव महाले, संजय चौधरी, अशोक सोनवणे, हेमंत कापडणे, स्वप्नील जायस्वाल, संदीपकुमार पवार, गणेशराम चौधरी, सुनील भांडारकर, राजेश सोनवणे, साबलराम चौधरी आदींच्या सह्या आहेत.