शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

डोंगरगाव रस्त्यावर धुळीमुळे नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 12:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातून जाणारा व कायम वर्दळ असलेल्या डोंगरगाव रस्ता दुरुस्तीसाठी मुरुम टाकण्यात आला आहे. या ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातून जाणारा व कायम वर्दळ असलेल्या डोंगरगाव रस्ता दुरुस्तीसाठी मुरुम टाकण्यात आला आहे. या मुरुममुळे प्रचंड प्रमाणात धूळ उडत असल्याने वाहनधारकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने अपघातही वाढले आहेत.याबाबत माहिती अशी की, शहादा-डोंगरगाव रस्त्यावर नवीन वसाहती  वाढल्या आहेत. याच रस्त्यावर म्हाळसादेवीचे मंदिर, साईबाबा मंदिर, सुघोषाघंट मंदिर यासह दवाखान्यांची मोठी संख्या आहे. त्यामुळे या रस्त्यावर सतत रहदारीची वर्दळ असते. डोंगरगाव, असलोद, मंदाणे, कजर्ाेत, पिंपर्डे, लोणखेडा, मलोणी या भागातून येणा:या नागरिकांची ये-जा या रस्त्यानेच होते. त्यामुळे वाहनांची सतत वर्दळ असते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणा:या या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली होती. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी मुरुमचा वापर करण्यात आला. या मुरुमवर पाणीही टाकण्यात आले नाही. त्यामुळे रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात धूळ उडत असल्याने रस्त्याला लागून असलेले रहिवासी, व्यावसायिकांसह वाहनधारकांच्या आरोग्याला बाधा पोहोचत आहे. सकाळी व संध्याकाळी शतपावली करणा:या नागरिकांनाही त्रास सहन करावा लागतो. अनेक नागरिकांना धुळीमुळे दमा, खोकला व अॅलर्जीचा त्रास होत आहे. बांधकाम विभागाच्या अधिका:यांना याबाबत लेखी व प्रत्यक्ष सांगूनही रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. रस्त्याच्या मध्यभागी नगरपालिकेमार्फत स्ट्रीट लाईट लावण्यात आल्याने रस्ता रुंद झाला. मोठे वाहन आले तर पादचारी व दुचाकी  वाहन चालकांना चालणेही मुश्किल होते. त्यातच रस्त्यावर डांबरी रस्ता शिल्लकच राहिलेला नाही. वाहन चालले तर एवढी धूळ उडते की रस्त्यावर चालणारा माणूस धुळीने भरुन जातो. शिवाय रस्ता अरुंद झाल्याने व खड्डे असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे.