अक्कलकुवा तालुक्यात लसीकरणावर विशेष भर दिला जात आहे. गाव-पाड्यांवर लसीकरण मोहीम राबवली जात असल्याचे चित्र आहे. परंतु दुसरीकडे खापर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीसाठी गावकऱ्यांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहे. खापर हे तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे. येथे लसीचा साठाही पुरेसा असावा. परंतु ४४ ते पुढील वयोगटातील लसीकरण झाल्यावर उर्वरित लस १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना देण्यात येतात. विशेष म्हणजे दैनंदिन होणारे लसीकरण हे कोणाच्या तरी शिफारशींवर होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थ सातत्याने करत आहेत. लसीकरण करणारे कर्मचारी सकारात्मक नसून येणाऱ्या ग्रामस्थांसोबत अरेरावी करत आहेत. यामुळे ग्रामस्थ अक्कलकुवा येथे जाऊन लस घेत असल्याची माहिती आहे. दरम्यान खापर येथील आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेवर कायमस्वरूपी चालक नसल्याची माहिती समाेर आली आहे. यामुळे येथील नागरिकांना अनेकवेळा खासगी रुग्णवाहिकेची सेवा घ्यावी लागत आहे. या आरोग्य केंद्रात १८ वयोगटापासून पुढील सर्व वयोगटांकरिता लसीकरण सुरू करून लसींचा पुरेसा साठा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
खापर केंद्रात लस मिळत नसल्याने नागरिक पोहोचतात अक्कलकुव्याला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:21 IST
अक्कलकुवा तालुक्यात लसीकरणावर विशेष भर दिला जात आहे. गाव-पाड्यांवर लसीकरण मोहीम राबवली जात असल्याचे चित्र आहे. परंतु ...
खापर केंद्रात लस मिळत नसल्याने नागरिक पोहोचतात अक्कलकुव्याला
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}