शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात सुरक्षेसाठी आता नागरिकांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 12:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : दिवसेंदिवस शहरातील गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. सोनसाखळी चोरी, मोटारसायकल चोरी, घरफोडी असे अनेक गुन्हे ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : दिवसेंदिवस शहरातील गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. सोनसाखळी चोरी, मोटारसायकल चोरी, घरफोडी असे अनेक गुन्हे शहादा शहरात घडत असल्याने हे वाढते गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांकडे मनुष्यबळ अपुरे पडत आहे. किती दिवस पोलिसांवर विसंबून राहायचे, आपली सुरक्षा आपणच करूया या सामाजिक बांधिलकीने शहरातील ब्रह्मसृष्टी कॉलनीतील नागरिकांनी एकत्र येत घर व परिसरावर नजर ठेवण्यासाठी सामूहिकरित्या सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित केले आहे.शहादा शहरातील जुना मोहिदा रस्त्यावर ब्रह्मसृष्टी कॉलनी असून, या कॉलनीत ५२ बंगले आहेत़ शहरातील विविध कॉलनी पैकी एक ब्रह्मसृष्टी असून या कॉलनी गणेश उत्सव, नवरात्रोत्सव यासह विविध धार्मिक उत्सव, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येत असल्याने ही कॉलनी एक आदर्श म्हणून नावारूपाला आली आहे. या कॉलनीतील रहिवाशांना लग्नप्रसंग किंवा काही अपरिहार्य कारणांमुळे घराला कुलूप लावून बाहेरगावी जाण्याचा प्रसंग नेहमी येत असतो. कॉलनीला लागून जाणारा जुना मोहिदा रस्त्यावर शहरातील व कॉलनीतील नागरिक शतपावली करण्यासाठी दैनंदिन येत असतात.या मार्गावर सायंकाळच्या दरम्यान सोनसाखळी पळविण्याच्या घटना घडल्या असून, युवतींची छेडखानी झाल्याच्या घटनादेखील घडलेल्या आहेत. त्याचप्रमाणे चोरटे हे अत्यंत चलाख व सफाईदार असल्याने घराचे कुलूप सहज तोडतात. परिणामी चोरीच्या घटना घडतात. घटना घडल्यावर फिर्याद, तपास आदी सोपस्कार सुरूच असतो. त्याचप्रमाणे इतरही ठिकाणी महिलांवरील अत्याचार, चोरीच्या घटना आदी बातम्या वृत्तपत्रातून झळकत असतात. हे सगळे वाचून येथील रहिवासी निवृत्त अभियंता जितेंद्र पाटील यांना कल्पना सूचली की, आपल्या कॉलनीपुरती का असेना सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केली पाहिजे.कॉलनीतील रहिवासी कामानिमित्त इतरत्र जात असतात. त्यामुळे दिवसभरातील सर्व घडामोडींवर सीसीटीव्ही कॅमेरातील फुटेजच्या माध्यमातून पोलिसांना तपासासाठी सहकार्य मिळत असून त्यांनी कॉलनीतील सगळ्या सहकाऱ्यांना बोलवून छोटेखानी बैठक घेत सीसीटीव्हीचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला सगळ्यांनी दुजोरा दिला. यात यथाशक्तीप्रमाणे सहकाऱ्यांनी सहभाग घ्यावा. कोणालाही सक्ती नसून उर्वरित खर्च स्वत: जितेंद्र पाटील यांनी केला.