मुख्यमंत्र्यांचा नंदुरबार दौरा ऐनवेळी रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 01:01 PM2020-02-15T13:01:16+5:302020-02-15T13:01:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना मातृशोक झाल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दौरा ऐनवेळी रद्द ...

Chief Minister's visit canceled at time | मुख्यमंत्र्यांचा नंदुरबार दौरा ऐनवेळी रद्द

मुख्यमंत्र्यांचा नंदुरबार दौरा ऐनवेळी रद्द

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना मातृशोक झाल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दौरा ऐनवेळी रद्द करण्यात आला. दौऱ्याच्या पार्श्वभुमीवर सर्व तयारी पुर्ण करण्यात आली होती. जीटीपी महाविद्यालयाच्या प्रांगणात मेळाव्यासाठी व्यासपीठ, मंडप टाकण्यात आला होता. पोलिसांनी वाहनांच्या ताफ्याची रंगीत तालीम देखील दुपारी केली.
नंदुरबार पालिकेच्या जलतरण तलावाचे उद्घाटन आणि पालिका इमारतीचे भुमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवार, १५ रोजी दुपारी होणार होते. त्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून तयारी पुर्ण करण्यात येत होती. मुख्यमंत्र्यांसोबत सेनेचे ज्येष्ठ नेते व पाच मंत्री देखील येणार होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे नंदुरबारात प्रथमच येणार होते. त्यामुळे पक्षातर्फे जय्यत तयारी करण्यात आली होती. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. जीटीपी महाविद्यालयाच्या प्रांगणात मेळाव्यासाठीची तयारी पुर्ण करण्यात आली होती. जलतरण तलावाच्या उद्घाटनासाठी उद्यान व टाऊन हॉल परिसर सजविण्यात आला होता. जुन्या कोर्टाच्या आवारात पालिका इमारत साकारली जाणार असल्याने या ठिकाणी भुमीपुजनासाठी देखील तयारी करण्यात आली होती.
प्रशासनाने दुपारी मुख्यमंत्र्यांच्या वाहनाच्या ताफ्याची रंगीत तालीम देखील घेण्यात आली. परंतु चार वाजता अचानक दौरा रद्द करण्यात आल्याचा संदेश जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. दुपारी पोलीस अधीक्षक कार्यालयात बंदोबस्तासाठी पोलिसांना सुचना देणे, बंदोबस्त नेमणे यासह इतर सुचना देण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांना बोलविण्यात आले होते. परंतु दौरा रद्द झाल्याचे कळाल्यानंतर पुढील नियोजन रद्द करण्यात आले.

Web Title: Chief Minister's visit canceled at time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.