पाच ठिकाणी तपासणी नाके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 13:15 IST2020-02-11T13:15:38+5:302020-02-11T13:15:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातुन जाणाऱ्या अवजड वाहनांची विशेषत: वाळू वाहतुक करणारे डंपरची तपासणी करण्यासाठी पाच ठिकाणी तपासणी ...

Check nails at five places | पाच ठिकाणी तपासणी नाके

पाच ठिकाणी तपासणी नाके

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातुन जाणाऱ्या अवजड वाहनांची विशेषत: वाळू वाहतुक करणारे डंपरची तपासणी करण्यासाठी पाच ठिकाणी तपासणी नाके तयार करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी दिल्या. ‘लोकमत’ने वाळू वाहतूकीवर सोमवारच्या अंकात प्रकाशझोत टाकल्यानंतर तातडीने ही बैठक घेण्यात आली.
जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीस जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे, कार्यकारी अभियंता अनिल पवार, दिलीप चौधरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नानासाहेब बच्छाव, नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.बी.डी.बिक्कड उपस्थित होते.
याबैठकीत डॉ.भारुड यांनी गेल्या महिनाभरात झालेल्या अपघाताची माहिती घेतली. नंदुरबार व शेजारील जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाळूची वाहतूक दिवस रात्र सुरु असल्याने रस्त्याची स्थिती खराब झालेली आहे.
वाळु वाहतुकीमुळे शहर हद्दीत जाणाºया वाहनाकडुन अपघात होण्याची शक्यता लक्षात घेता वाळु वाहतुक करणाºया वाहनांची तपासणी पोलीस, आरटीओ व महसुल विभागाच्या संयुक्त पथकाने करावी अशा सुचना त्यांनी दिल्या.
वाका चार रस्ता नंदुरबार, प्रकाशा ता.शहादा, नवापुर-गुजरात चेक पोस्ट जवळ, करंजवेल, खैरवे ता.नवापुर या मार्गाने होणाºया वाळू वाहतुकीच्या मार्गावर वाळू वाहतूकीच्या वाहनांची पावती तपासुन त्यावर तपासल्याचा शेरा तसेच दिनांक व वेळ नमुद करावे. वन विभागाच्या नवापूर व शहादा येथील चेकपोस्टवरही सदर वाहन तपासणी पथक स्थापन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
दरम्यान, कारवाईपुरती ही मोहिम न राहता कायमस्वरूपी सुरू ठेवावी. शहरातून जाणाºया जड वाहनांवर लक्ष ठेवावे किंवा त्यांचा मार्ग बदलण्यात यावा अशी मागणी देखील करण्यात येत आहे.

Web Title: Check nails at five places