लाॅकडाऊन काळातही स्वस्त धान्य होणार उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:31 IST2021-03-31T04:31:06+5:302021-03-31T04:31:06+5:30

नंदुरबार : जिल्ह्यात लाॅकडाऊनमुळे कुटूंब लाभार्थींची गैरसोय होणार नाही. यासाठी स्वस्त धान्य दुकानांपर्यंत पोहोचते करुन त्याचे वितरण सुरु ठेवण्याचे ...

Cheap grain will be available even during the lockdown | लाॅकडाऊन काळातही स्वस्त धान्य होणार उपलब्ध

लाॅकडाऊन काळातही स्वस्त धान्य होणार उपलब्ध

नंदुरबार : जिल्ह्यात लाॅकडाऊनमुळे कुटूंब लाभार्थींची गैरसोय होणार नाही. यासाठी स्वस्त धान्य दुकानांपर्यंत पोहोचते करुन त्याचे वितरण सुरु ठेवण्याचे आदेश पुरवठा विभागाकडून काढण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

जिल्ह्यात ३ लाख वीस हजार रेशनकार्ड धारक आहेत. यात एक लाख ७१ हजार ४२८ हे प्राधान्य कुटूंब लाभार्थी आहेत. एक लाख ४ हजार ७०६ अंत्योदय तर तीन हजार पांढरे कार्ड धारक आहेत. या लाभार्थींसाठी एकूण १ हजार २५२ स्वस्त धान्य दुकाने चालवण्यात येत आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने चालवण्यात येणा-या या दुकानांमध्ये सध्या गहू, तांदूळ, ज्वारी आणि डाळ उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती आहे. प्राधान्य, अंत्योदय कार्डधारकांसाठी ठरवून दिलेल्या प्रमाणात स्वस्तधान्याचे वितरण सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे. लाॅकडाऊन काळात सर्वांना नियमित धान्य मिळावे यासाठी सूचना करण्यात आल्या असून लाॅकडाऊन काळातही अत्यावश्यक सेवा म्हणून धान्य पुरवठा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान एक क्लिकवर आता धान्य मिळत असल्याने दुकानांमधील गर्दी कमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

Web Title: Cheap grain will be available even during the lockdown