चंद्रकांत रघुवंशी यांना मातृशोक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 12:48 IST2020-02-15T12:47:45+5:302020-02-15T12:48:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार तालुका विधायक समिती अध्यक्षा विमलबाई बटेसिंह रघुवंशी (८२) यांचे १४ रोजी अल्पश ा ...

Chandrakant Raghuvanshi mourns mourning | चंद्रकांत रघुवंशी यांना मातृशोक

चंद्रकांत रघुवंशी यांना मातृशोक

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नंदुरबार तालुका विधायक समिती अध्यक्षा विमलबाई बटेसिंह रघुवंशी (८२) यांचे १४ रोजी अल्पश ा आजाराने निधन झाले.
शनिवार, १५ रोजी सकाळी १० वाजता नंदुरबार येथील निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघेल. जी.टी.पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात अंतिम संस्कार होतील.
विमलबाई रघुवंशी काही दिवसांपासून आजारी होत्या. धुळे येथे उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात मुले ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड.राजेंद्र रघुवंशी, माजी आमदार, शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी, नंदुरबार तालुका विधायक समितीचे उपाध्यक्ष मनोज रघुवंशी, मुलगी अर्चना रघुवंशी, सून अनिता रघुवंशी, नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, कविता रघुवंशी, नातू जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अ‍ॅड.राम रघुवंशी, नगरसेवक यशवर्धन रघुवंशी, किरण रघुवंशी, डॉ.तुषार रघुवंशी व नातवंडे होत.
इंदिरा महिला सहकारी बँकेच्या संस्थापक अध्यक्षा, नंदुरबार तालुका विधायक समितीच्या अध्यक्षा, इंदिरा महिला सहकारी गृहउद्योग व जीवनाश्यक वस्तु पुरवठा भांडाराच्या अध्यक्षा यासह विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. तसेच नंदुरबार नगरपालिकेच्या दहा वर्ष नगरसेविका होत्या. माजी आमदार कै.बटेसिंह रघुवंशी यांच्या राजकीय, शैक्षणिक व सामाजिक जिवनात त्यांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले.
त्यांना साक्री तालुका एज्युकेशन सोसायटीचा वेणुताई शंकरराव बेडसे आदर्श माता पुरस्कार व ‘लोकमत’ सखी मंचचा जिवनगौरव पुरस्काराने देखील त्यांना गौरविण्यात आले होते.

Web Title: Chandrakant Raghuvanshi mourns mourning