शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अस्वच्छतेमुळे सभापतींकडून राजीनाम्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 20:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : शहरातील स्वच्छतेच्या कामांसाठी नेमण्यात आलेला ठेकेदार हा मनमानी कारभार करीत आहे. त्यामुळे शहरात नेहमीच ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : शहरातील स्वच्छतेच्या कामांसाठी नेमण्यात आलेला ठेकेदार हा मनमानी कारभार करीत आहे. त्यामुळे शहरात नेहमीच स्वच्छतेचा प्रश्न निमाण होत आहे. परिणामी डासांचे प्रमाणही वाढले असून त्याला शहरातील नागरिक बळी पडत आहे. या ठेकेदाराच्या कारभाराला कंटाळून सभापती पदाचा राजीनामा देणार असल्याचा इशारा आरोग्य सभापती मंगला सैन यांनी दिला आहे. शहरातील विविध भागात डासांचे प्रमाण वाढले आहे. स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी फवारण्यात येणा:या मिश्रणात औषध कमी आणि रॉकेलच अधिक आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शहरातील साईनगरातील नागरिकांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांना निवेदन दिले. नगरपालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.याविषयी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरात स्वच्छतेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. अनेक भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. शहरातील साईनगरी डेंग्यूसदृश आजाराचे सात रुग्ण आढळले आहे. अन्य भागातही डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून येत आहे. शहरातील अनेक नागरिक रोज सकाळी व सायंकाळी बसस्थानक परिसर ते कॉलेज रोड, साईमंदिर आदी भागात फिरायला जातात. या भागात डासांमुळे नागरिकानां फिरणेही मुश्किल झाले आहे. शहरातील प्रत्येक परिसरात हिच परिस्थिती आहे.  औषधाऐवजी केवळ रॉकेलची फवारणी केली जात आहे. स्वच्छतेच्या कामासाठी नेमण्यात आलेल्या ठेकेदारावर नगरपालिका प्रशासनाचा वचक नाही. त्यामुळे स्वच्छतेचे बारा वाजले आहेत. स्वच्छता राखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर डॉ. अमित मावची, महेंद्र वळवी, राजेंद्र नेरकर, महेश पुरकर, एन. एन. महाजन, सी. एम. फराटे, उल्हास पाथरकर यांच्या सह्या आहेत. दरम्यान, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून अनेक भागात औषध फवारणी वेळेवर केली जात नाही. स्वच्छतेच्या कामासाठी नेमण्यात आलेल्या ठेकेदाराच्या कारभाराला वैतागून आरोग्य सभापती मंगला सैन यांनी सभापतीचा राजीनामा देण्याचा इशारा दिला  आहे. 

शहरात स्वच्छतेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. अनेक भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. शहरातील साईनगरी डेंग्यूसदृश आजाराचे सात रुग्ण आढळले आहे. अन्य भागातही डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून येत आहे. याला सर्वस्वी शहरातील अस्वच्छता कारणीभूत असल्याची तक्रार करण्यात आली.