महिला महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:20 IST2021-06-22T04:20:58+5:302021-06-22T04:20:58+5:30

एन.डी. माळी यांनी भारतीय योग परंपरा कशी श्रेष्ठ आहे, याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रात्यक्षिक सत्रात मान, खांदे, कंबर, ...

Celebrate International Yoga Day at Women's College | महिला महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

महिला महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

एन.डी. माळी यांनी भारतीय योग परंपरा कशी श्रेष्ठ आहे, याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रात्यक्षिक सत्रात मान, खांदे, कंबर, गुढगे आदींचे सूक्ष्म व्यायाम शिकवले व करवून घेतले. तसेच प्राणायाम, अनुलोम विलोम फुप्फुसाचे व्यायाम, सूर्यनमस्कार इत्यादींबाबत मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करून घेतले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.डी.एस. पाटील यांनी योग ही आपणास मिळालेली अमूल्य भेट असून आज सर्व जगाने योगाचे महत्त्व मानले आहे. तरी कोरोना काळात नियमित योग करून आपले व परिवाराचे आरोग्य जपण्याचे आवाहन केले. प्रास्तविक रासेयो प्रमुख कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.एस.एच. झैदी यांनी केले. सूत्रसंचालन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.आर.एम. साळुंके यांनी केले. महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. मीना हजारी यांच्या ऋणनिर्देशाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Web Title: Celebrate International Yoga Day at Women's College