शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

सीसीआयने कापसातील ‘ओलावा’ वाढवल्याने दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बाजार समितीच्या पळाशी  येथील राजीव गांधी खरेदी केंद्रात शेतक:यांचा कापूस खरेदी करणा:या सीसीआयने कापसातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बाजार समितीच्या पळाशी  येथील राजीव गांधी खरेदी केंद्रात शेतक:यांचा कापूस खरेदी करणा:या सीसीआयने कापसातील ओलाव्याला काहीअंशी नजरअंदाज करण्याचा निर्णय घेतल्याने शेतक:यांना दिलासा मिळाला आह़े यातून गुरुवारी दिवसभरात याठिकाणी तब्बल दीड हजार क्विंटल कापूस आवक झाली होती़               नंदुरबार जिल्ह्यात दोन केंद्रांवर 15 दिवसांपूर्वी सीसीआयने कापूस खरेदी सुरु केली होती़ परंतू कापसात ओलावा अधिक असल्याचे कारण देत सीसीआय प्रतिनिधींनी खरेदी करणे टाळले होत़े यातून शेतक:यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेत निवेदन दिले होत़े या निवेदनांनंतर गेल्या आठवडय़ात खरेदी पूर्ववत सुरु करण्यात आली होती़ यावेळी मात्र शेतक:यांनी कोरडा कापूस विक्रीला आणल्यानंतर खरेदी सुरळीत सुरु झाली होती़ परंतू  ही आवक अत्यंत नगण्य असल्याने अखेर सीसीआयनेच त्यांची 8 ते 12 टक्के कापूस ओलाव्याची अट काहीशी शिथिल करत मापदंड न लावता कापूस खरेदी करणे सुरु केल्याने शेतक:यांचा प्रतिसाद वाढला होता़ सध्या जिल्ह्यात केवळ सीसीआय कापसाला प्रतिक्विंटल दर देत असल्याने शेतक:यांचा त्यांच्याकडे ओढा आह़े यातून कापूस आवक वाढत असल्याचे चित्र आह़े 

नंदुरबार येथील खरेदी केंद्रात बाजार समिती नियुक्त केलेल्या परवानाधारक व्यापा:यांकडून कापसाला प्रतिक्विंटल 4 हजार 800 रुपयांर्पयत दर देण्यात आले आहेत़ तर सीसीआयने यंदा 5 हजार 550 रुपयांचा प्रतिक्विंटल भाव जाहिर केला आह़े सीसीआयने ओलाव्याची अट टाकल्याने शेतकरी नाराज झाले होत़े चालू आठवडय़ात सीसीआयकडून अट शिथिल करत 16 टक्क्यांर्पयत ओलावा असलेला कापूस खरेदी करण्यास सुरुवात करण्यात आली आह़े परंतू यातही ओलावा असलेल्या या कापसाला हमीभाव मात्र दिला जात नाही़ 16 टक्क्यांर्पयत ओलावा असलेल्या कापसाला किमान 5 हजार 253 रुपये प्रतिक्विंटलर्पयतच दर देण्यात येत आह़े या दरांना शेतक:यांची पसंती असून सीसीआयकडून आठ दिवसाच्या आत पैसे मिळत असल्याने त्याठिकाणी कापूस विक्री करण्यावर प्राधान्य देण्यात येत आह़े गुरुवारी दिवसभरात याठिकाणी 50 वाहनांची आवक झाली होती़ यातील 40 वाहनांमधील कापूस हा सीसीआयने तर 10 वाहनांमधील कापूस हा खाजगी व्यापा:यांनी खरेदी केला होता़ कापूस खरेदीत सीसीआयने अचानकपणे आघाडी घेतल्याने बाजारातील चित्रही बदलेले आह़े नंदुरबारसोबत शहादा येथील खरेदी केंद्रावरही कापूस वाहनांची वर्दळ वाढत असल्याची माहिती दिली गेली आह़े 

नंदुरबार बाजारातून सीसीआयने  सुमारे 5 हजार क्विंटल कापूस सीसीआयने खरेदी केला आह़े या कापसाला 5 हजार 300 रुपयांर्पयत दर देण्यात आले आह़े येत्या आठवडय़ात आवक आणखी वाढणार असल्याचा अंदाज आह़े यातून सीसीआय नंदुरबार येथील केंद्रावरुन किमान 35 हजार क्विंटल कापूस खरेदी करुन घेऊन जाण्याची शक्यता वर्तवली जात आह़े  दुसरीकडे शहादा बाजारातही कापूस खरेदी जोरदारपणे सुरु आह़े याठिकाणी सीसीआयकडून आजअखेरीस 4 हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आह़े शहादा तालुक्यातील बहुतांश शेतक:यांकडून कोरडाच कापूस विक्रीसाठी आणला जात असल्याने त्याला सीसीआय हमीभावानुसार खरेदी करत असल्याचे सांगण्यात आले आह़े येथील शेतक:यांनी खेडा खरेदी करणा:यांना पूर्णपणे नकार दिल्याने सीसीआयकडे कापूस आवक वाढणार आह़े