शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
3
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
4
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
5
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
6
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
7
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
8
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
9
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
10
‘तुम्ही घुसखोर आहात का? हे सिद्ध करण्याची वेळ आणू नका’ म्हाडाच्या उपाध्यक्षांची नागरिकांना दमदाटी
11
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
12
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
13
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
14
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
15
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
16
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
17
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
18
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
19
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
20
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

जमावबंदी आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबधीत अधिकारी करतील गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 11:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जमावबंदी कालावधीत प्रतिबंधीत करण्यात आलेल्या बाबींचे उल्लंघन झाल्यास फिर्याद दाखल करण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जमावबंदी कालावधीत प्रतिबंधीत करण्यात आलेल्या बाबींचे उल्लंघन झाल्यास फिर्याद दाखल करण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी संबंधित विभाग आणि अधिकारी यांना प्राधिकृत केले आहे.जमावबंदी कालावधीत ५ पेक्षा अधिक व्यक्ती किंवा समूह जमा झाल्यास. रात्री ९ ते सकाळी ५ दरम्यान फिरण्यास असलेल्या बंदीचे उल्लंघन झाल्यास. आंतरजिल्हा विना परवाना प्रवास केल्यास, प्रतिबंधीत क्षेत्रातील व्यक्ती इतर क्षेत्रात फिरल्यास आणि जिल्ह्यात सभा, मेळावे, सामाजिक कार्यक्रम, राजकीय कार्यक्रम, जत्रा, यात्रा, ऊरूस, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनाचे कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा व आठवडे बाजार भरविल्यास पोलीस विभागाचे सक्षम अधिकारी फिर्याद दाखल करतील.सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल न वापरल्यास, सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखू सेवन करणे व थुंकणे, दुकानात प्रत्येक व्यक्तीमध्ये ६ फुटाचे अंतर न ठेवणे व एकाचवेळी ५ पेक्षा अधिक ग्राहक असल्यास कारवाई होईल. तसेच बाजार किंवा दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेव्यतिरिक्त सुरू ठेवल्यास नगरपालिका किंवा नगर पंचायत क्षेत्र मुख्याधिकारी व ग्रामीण क्षेत्रासाठी विस्तार अधिकारी फिर्याद दाखल करतील.सार्वजनिक ठिकाणी दारुचे सेवन केल्यास राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाचे सक्षम अधिकारी, सार्वजनिक आणि खाजगी वाहतुकीसाठीच्या निदेर्शाचा भंग केल्यास मोटार वाहन विभागाचे व पोलीस विभागाचे सक्षम अधिकारी, विवाह समारंभात ५० पेक्षा अधिक व्यक्ती तसेच प्रेतयात्रेत २० पेक्षा अधिक व्यक्ती सहभागी असल्यास व सोशल डिस्टन्सिंगचे पालन न झाल्यास संबंधीत क्षेत्रातील इन्सिडंट कमांडर यांच्या निदेर्शान्वये महसूल किंवा पोलीस विभागाचे सक्षम अधिकारी फिर्याद दाखल करतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. करण्यात येत असलेली कारवाई जिल्हा नियंत्रण कक्षास तात्काळ अवगत करावी, असेही आदेशीत करण्यात आले आहे.