शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

तीन शिफ्टमध्ये घेतली जाते काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 12:42 IST

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी क्वारंटाईन कक्षांची निर्मिती करण्याचा निर्णय झाल्यानंतर ...

भूषण रामराजे ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी क्वारंटाईन कक्षांची निर्मिती करण्याचा निर्णय झाल्यानंतर सर्वात प्रथम नंदुरबारात होळ तर्फे हवेली शिवारातील सामाजिक न्याय विभागाच्या निवासी शाळेची निवड करण्यात आली होती़ येथे ५० खाटांची सर्वात प्रथम सोय होती़ यात वाढ करुन शहरालगतच तीन आणखी कक्ष निर्माण करुन आतापर्यंत १९० जणांवर उपचार झाले आहेत़जिल्हा आरोग्य विभागाने दिलेल्या आदेशानंतर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ जे़एच़तडवी यांच्या मार्गदर्शनात होळ तर्फे हवेली, पॉलिटेक्निक कॉलेज आणि पटेलवाडी भागातील आदिवासी मुलांच्या वसतीगृहात तीन कक्षांची निर्मिती करण्यात आली होती़ एकूण १८० खाटांची सोय याठिकाणी करण्यात आली आहे़ कक्षात आतापर्यंत १९० जणांना आणले गेले होते़ यातील १०८ जण सुखरुप घरी गेले आहेत़ तर ८२ जणांवर येथे उपचार सुरु आहेत़ उपचारांपेक्षा त्यांच्यावर केवळ लक्ष ठेवले जात असल्याचे सांगण्यात आले आहे़ यातील बहुतांश जण हे बाहेरगावाहून याठिकाणी आले आहेत़ त्यांना सोशल डिस्टन्सिंगद्वारे अन्नपुरवठा, पाणी देणे तसेच पीपीई कीट परिधान करुन वैद्यकीय अधिकारी माहिती देत आहेत़ २४ तास कक्षात राहणे शक्य नसल्याने मानसिक समस्या येण्याची अडचण लक्षात घेत सर्वांना वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक देण्यात आले आहेत़ अडचण किंवा शंका असल्यास फोन करुन माहितीचे आदान-प्रदान करण्यावर भर दिला जात आहे़ यातून येथे असलेल्या ८२ जणांना बराच मोठा दिलासा मिळाला आहे़ भेटणारे किंवा बाहेरुन कोणासह परवानगी नसल्याची माहिती देण्यात आली आहे़दरम्यान आरोग्य विभागाने विमल विहार या भागात आणखी ३० बेडची क्षमता असलेला कक्ष सुरु केला आहे़ याठिकाणीही क्वारंटाईन केलेल्या नागरिकांना आणून ठेवले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ चार कक्षांसाठी तीन शिफ्टमध्ये प्रत्येकी एक मेडीकल आॅफिसर, एक आरोग्य सेविका व एक एमपीडब्ल्यू यांची नियुक्ती आहे़ आठ तासांच्या सेवेत हे पथक प्रत्येक क्वारंटाईन केलेल्याची भेट घेत त्यांच्यासोबत संवाद साधतात़संख्या वाढत असल्याने आरोग्य विभागाने लहान शहादे आणि ढेकवद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांची मदत घेतली आहे़ हे अधिकारी इंचार्ज म्हणून केंद्रांवर नियुक्त करण्यात आले आहेत़तीन कक्षांसाठी विविध विभागाचे कर्मचारी नियुक्त४नंदुरबार शहरातील तीन क्वारंटाईन कक्षांमध्ये महसूल, आरोग्य, ग्रामपंचायत, नगरपालिका आणि आदिवासी विकास विभाग यांचे ३१ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत़ हे कर्मचारी सकाळी ९ वाजेपासून येथे हजर होतात़४जिल्हा प्रशासनाकडून क्वारंटाईन कक्षांच्या खर्चासाठी ८० लाख रुपयांचा निधी वितरीत केला होता़ यातून सर्व कक्षांमध्ये पंखे, बेड यासह विविध साहित्याची खरेदी करुन ते येथे दाखल असलेल्यांना देण्यात येत आहे़४बाह्य जगासोबत संपर्क तुटला असला तरी कुटूंबासोबत संपर्क ठेवण्यासाठी मोबाईलचा वापर केला जातो़ यातून मानसिक आधार मिळत असल्याचे सांगण्यात आले़४क्वारंटाईन कक्ष सुरु असलेल्या सर्व इमारती ह्या प्रामुख्याने शासकीय वसतीगृहे आहेत़ त्यामुळे त्यांचे परत हस्तांतरण करण्यापूर्वी किमान चारवेळा निर्जंतुकीकरण होणार आहे़ चारही ठिकाणी दिवसातून एकवेळा संपूर्ण खोल्यांचे निर्जंतुकीकरण करण्यावर भर दिला जात आहे़