शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

शेल्टर होममधून पळालेले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 21:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापुर : शेल्टर होम मधून पळालेल्या आठ युवकांना खातगाव रेल्वे स्थानकावरुन एलसीबीच्या पथकाने काही तासातच ताब्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापुर : शेल्टर होम मधून पळालेल्या आठ युवकांना खातगाव रेल्वे स्थानकावरुन एलसीबीच्या पथकाने काही तासातच ताब्यात घेतले आहे़ जेवणाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप मध्यप्रदेशातील या मजुरांनी दोन दिवसांपुर्वीच केला होता.लॉकडाऊन दरम्यान सहा एप्रिल रोजी मध्यप्रदेशातील ३४ युवक सुरत येथून इंदौरकडे पायी जात असतांना राज्याच्या सीमेवर नवापूर पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतले होते़ त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना सीमा परिवहन तपासणी नाक्यावर उभारलेल्या शेल्टर होममध्ये रवाना करण्यात आले होते़कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सावधगिरीचा उपाय म्हणून गुजरात राज्यातून ३४ मजुर पायी घराकडे निघाले होते. या युवकांनी २६ रोजी तेथे निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल केला होता. प्रशासन खडबडुन जागे झाल्याने अधिकाऱ्यांकडून त्याची तातडीने दखल घेत त्यांची भेट घेऊन सुविधा पुरवण्याचा उपाय म्हणुन त्यांना कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वसतीगृहात ठेवण्यात आले होते. रविवारी रात्री ते पहाटेच्या दरम्यान ३४ पैकी आठ युवकांनी दरवाजाची कडी तोडून तेथून रेल्वे रुळाची वाट धरुन पलायन केले होते. आठ जण तेथून पोबारा करुन निघुन गेल्याने त्यांचा शोध सुरु झाला. अवघ्या काही तासात एलसीबीच्या शाखेकडून नवापुर पासुन सुमारे ३० किलोमीटर अंतरावर खातगाव रेल्वे स्थानकावरुन त्या आठही जणांना ताब्यात घेऊन पुन्हा नवापूर येथे आणण्यात आले. ही कारवाई पोलीस निरिक्षक किशोर नवले, पोलीस उप निरीक्षक योगेश राऊत, पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक गोरे, महेंद्र नगराळे, दादा वाघ, पोलीस नाईक प्रमोद सोनवणे, शांतीलाल पाटील, राकेश वसावे, महिला पोलीस नाईक पुष्पलता जाधव, पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र तोरवणे, राजेंद्र कटके, विजय ढिवरे, यशोदीप ओगले व सतीश घुले यांनी केली.नवापुर तहसील प्रशासन सेवाभावी संस्थांच्या मदतीने शेल्टर होममध्ये अन्न पुरवठा करण्यावर भर देत आहे़ मजूरांपैकी कोणाला काही काम देता येईल का, यावरही विचार सुरु आहे़ कौशल्यानुसार रोजगार देण्याबाबत लवकरच निर्णय होणार आहे़