बसची दुचाकीस्वाराला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 13:04 IST2021-02-03T13:04:04+5:302021-02-03T13:04:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा बसस्थानकातून अक्कलकुवाकडे जाणाऱ्या जळगाव‌-अंकलेश्वर बस समोर अचानक दुचाकीस्वार आल्याने अपघात झाल्याची घटना घडली. ...

The bus hit the two-wheeler | बसची दुचाकीस्वाराला धडक

बसची दुचाकीस्वाराला धडक

लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : तळोदा बसस्थानकातून अक्कलकुवाकडे जाणाऱ्या जळगाव‌-अंकलेश्वर बस समोर अचानक दुचाकीस्वार आल्याने अपघात झाल्याची घटना घडली. दरम्यान या अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाले असून, त्यांना बसचालकाच्या मदतीने जवळच्या खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.
याबाबत असे की, जळगाव-अंकलेश्वर बस क्रमांक एमएच २०- बीएल ३१५३ ही बस बसस्थानकाच्या प्रवेशद्वारातून बाहेर निघत असताना समोरून भरधाव वेगाने येत असलेल्या दुचाकीस्वाराचे वाहनवरील नियंत्रण सुटून तो अचानक बसच्या पुढील चाकात आल्याची घटना घडली. बसचालकाने प्रसंगावधान राखत तातडीने ब्रेक लावल्यामुळे तिघे तरूण या भीषण अपघातात बाल बाल बचावले. यात दोन तरूण किरकोळ जखमी झाले असून, एकास मुक्कामार लागला आहे. बसचालकाने त्या तरूणांना जवळच्या खाजगी रूग्णालयात दाखल करून त्यांवर औषधोपचाराचा खर्च ही करण्यात आला. या घटनेत दुचाकीचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झालेली नाही.

Web Title: The bus hit the two-wheeler