शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

महिला मंडळाच्या शाळेत गड-किल्ले बनवा स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 12:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : महिला मंडळ संस्थेच्या येथील प्राथमिक शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी गड-किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : महिला मंडळ संस्थेच्या येथील प्राथमिक शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी गड-किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी संस्थेचे सचिव अ‍ॅड.राजेश कुलकर्णी, मुख्याध्यापिका ताराबाई बेलदार, चतुर्भुज शिंदे उपस्थित होते. शाळेतील तिसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी गड-किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आजच्या काळात लहान मुले व विद्यार्थी मोबाईलचा जास्त वापर करीत असून मैदानी खेळ, इतिहास, महापुरुष याबद्दल त्यांना पाहिजे तेवढी माहिती नसते. यामुळे लहानपणी त्यांना इतिहास व शिवरायांचे विविध किल्ल्यांविषयी माहिती व्हावी या उद्देशाने शाळेच्या वतीने गड-किल्ले बनवा स्पर्धा घेण्यात आली. यात शिवनेरी, रायगड, प्रतापगड, जंजिरा, जलदुर्ग, रामशेज, पन्हाळा आधी किल्ल्यांच्या प्रतिकृती विद्यार्थ्यांनी तयार केल्या होत्या. विद्यार्थ्यांना शाळेच्या शिक्षिका सुनिता पाटील, कविता पटले, पायल दोडवे, सुनिता सोनवणे, मेघा जगताप, ज्योती पालकडे आदींचे मार्गदर्शन लाभले.