शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
2
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
3
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
6
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
7
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
8
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
9
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
10
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
11
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
12
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
13
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
14
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
15
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
16
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
17
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
18
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
19
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
20
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
Daily Top 2Weekly Top 5

भवर नदीवरील पुलाला भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 12:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा तालुक्यातील धवळीविहीर ते हलालपूर दरम्यान असलेल्या भवर नदीला पूर आल्यामुळे नदीवरील भगदाड पडलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : तळोदा तालुक्यातील धवळीविहीर ते हलालपूर दरम्यान असलेल्या भवर नदीला पूर आल्यामुळे नदीवरील भगदाड पडलेल्या पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे धवळीविहीर ग्रामस्थांना भगदाड पडलेल्या पुलाच्या कठड्यावरून जीव धोक्यात घालून मार्गक्रमण करावे लागत आहे.
गेल्यावर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे तळोदा तालुक्यातील धवळीविहीर ते हलालपूर दरम्यान असणाऱ्या भवर नदीवरील पुलाला भले मोठे भगदाड पडले होते. पुलाची उंची कमी असल्याने व गेल्यावर्षी सातत्याने झालेल्या मुसळधार पावसामुळे सुमारे महिनाभर पुलावरून पाणी वाहत होते. अश्या परिस्थिती या पुलाला पडलेले हे जीवघेणे भगदाड अधिकच धोकेदायक बनले होते. पुलावरील वाहत्या पाण्यात रस्त्याचा अंदाजा घेत व त्या भगदाडला चुकवीत धवळीविहीर ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी महिनाभर प्रवास केला होतो. दरम्यान, यंदादेखील या सर्व प्रकाराची पुनरावृत्ती झाली आहे.
यावर्षीदेखील या पुलावरून पाणी वाहत असून, नागरिकांना पुलावरील हे भगदाड चुकवीत पाण्यातून मार्गक्रमण करावे लागत आहे. पुलावरील पाण्याचा तीव्र प्रवाह, कमकुवत झालेला पूल व पुलावरील जीवघेणे भगदाड यामुळे या पुलावरून प्रवास करणे ही मोठी जीवघेणी कसरत ठरत आहे. धवळीविहीर गावाला जोडणारा हा एकमेव पक्का रस्ता असून, नदीला आलेल्या पुरामुळे तो बंद झाला आहे.
गेल्या वर्षभरापासून या पुलाची हीच स्थिती असून, वर्षभरात कोणत्याही प्रकारच्या दुरूस्तीचे काम झालेले नाही. याबाबत पावसाळ्यात नदीला पूर आल्यास मागील वर्षाची पुनरावृत्ती होईल, याबाबत ‘लोकमत’ने सचित्र व वस्तुनिष्ठ वृत्त प्रसिध्द करून नागरिकांची ही समस्या मांडली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सीमा वळवी व आमदार राजेश पाडवी यांनी या पुलाला भेट देवून पुलाची पाहणी केली होती. दरम्यान या ठिकाणी नव्या पुलाच्या कामाला मंजुरी मिळाली असून, लॉकडाऊनमुळे निविदा व अन्य तांत्रिक प्रक्रिया न होऊ शकल्याने कामास सुरूवात करता आली नसल्याचे बांधकाम विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे.
काही दिवसांपूर्वी या भगदाडमध्ये एक दुचाकीस्वार आपल्या लहान मुलांसह पडला होता. सुदैवाने या अपघात कोणालाही गंभीर दुखापत झाली नव्हती. पुलाचे काम तत्काळ करणे शक्य नसले तरी पुलाला पडलेले हे भगदाड पुलावरून पाणी वाहत नसतानादेखील जीवघेणे ठरत आहे. किमान हे भगदाड बुजवावे, अशी वाहनधारकांची मागणी होती. मात्र तिच्याकडेदेखील पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
या सर्व प्रकारामुळे धवळीविहीर ग्रामस्थांचा तालुका मुख्यालयाला जोडणारा मुख्य मार्ग बंद झाला आहे. पुलाला पडलेले हे भगदाड वर्ष उलटले असले तरी तसेच असून, नदीला पूर आल्यास यावर्षीदेखील धवळीविहीर ग्रामस्थांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. धवळीविहीर ग्रामस्थांना तळोदा येथे येण्यासाठी गणेश बुधावल फाटा एक दुसरा कच्चा मार्ग आहे. परंतु तो रस्ता मातीचा असल्याने सध्या त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने कोणाच्याही उपयोगाचा ठरत नाही. मोटरसायकल सुद्धा त्या मार्गाने व्यवस्थित जाऊ शकत नाही, अशी या रस्ताची परिस्थिती आहे.
यामुळे धवळीविहीर ग्रामस्थ या वाहणाºया पाण्यातून व भगदाड पडलेल्या पुलावरून मार्गक्रमण करण्याचा धोकेदायक पर्याय स्वीकारत आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांच्या या समस्येकडे लक्ष देणे गरजेचे आहे.