पातोंडा येथे रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 12:33 IST2019-12-21T12:33:44+5:302019-12-21T12:33:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नेत्र विकारांवर मात करण्यासाठी बार्टी व शासकीय हेल्थ वेलनेस सेंटरमार्फत पातोंडा ता.नंदुरबार येथे नेत्र ...

Blood Donation Camp at Patonda | पातोंडा येथे रक्तदान शिबिर

पातोंडा येथे रक्तदान शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नेत्र विकारांवर मात करण्यासाठी बार्टी व शासकीय हेल्थ वेलनेस सेंटरमार्फत पातोंडा ता.नंदुरबार येथे नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. याचवेळी रक्तदानाचा उपक्रमही राबविण्यात आला.
यावेळी बार्टीचे जिल्हा प्रकल्प अधिकारी बी.वाय.पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील वळवी, नेत्ररोग तज्ञ डॉ. शाम सूर्यवंशी, डॉ.एस.ए. सांगळे, डॉ.सुधीर देसाई, सरपंच जीतू नाईक, डॉ. मनीष नांद्रे आदी उपस्थित होते. दरम्यान गरोदर माता, स्तनदा माता, बालके, अन्य आरोग्य समस्या असलेल्यांनी हेल्थ वेलनेस सेंटरमधून तपासणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले. बार्टी संस्थेमार्फत बी. वाय. पाटील यांच्या हस्ते मान्यवरांना संविधानाच्या प्रती भेट म्हणून देण्यात आल्या. पातोंडा येथे अजुन काही दिवस बार्टीमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.
कार्यक्रमासाठी डॉ. राकेश पाटील, माया वाघ, हीना गावीत, प्रवीण ब्राम्हणे, गायत्री पाठक, कुसुम गावीत, संगीता पाटील, रेखा नरभवर, साधना पिंपळे, भारती मराठे, बार्टीचे समन्वयक समतादूत मीनाक्षी दांडेकर, समतादूत सारीका दहिवेलकर, ब्रिजलाल पाडवी, महेंद्र चव्हाण, जयेश सोनवणे, सुभाष निकम, राजेंद्र मोरे, दीपक पेंढारकर यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Blood Donation Camp at Patonda