शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

लाेणखेडा येथे ५३ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:20 IST

लोणखेडा गावातील चार रस्तालगत स्व.आण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या पुतळा परिसरात गुरुवारी हे रक्तदान शिबिर घेण्यात आले. कोरोना महामारीमुळे सर्वत्र रक्ताचा ...

लोणखेडा गावातील चार रस्तालगत स्व.आण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या पुतळा परिसरात गुरुवारी हे रक्तदान शिबिर घेण्यात आले. कोरोना महामारीमुळे सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने सामाजिक कर्तव्य म्हणून २ जुलैपासून 'लोकमत रक्ताचं नातं' या अभियानांतर्गत नंदुरबार जिल्ह्यात विविध गावांमध्ये आणि शहरांमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व.जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त 'लोकमत' आणि विविध शहर ग्राम गुजर ग्लोबल मित्र मंडळ (व्हीएसजीजीएम) यांच्या संयुक्त विद्यमाने लोणखेडा येथे हे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, सरदार वल्लभभाई पटेल, स्व.आण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन शहादा नगरपालिकेचे गटनेते प्रा.मकरंद पाटील, मयुर दीपक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संजय दशरथ पाटील, पोलीस पाटील युवराज पाटील, सोसायटीचे चेअरमन अशोक चिंधा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ईश्वर रामदास पाटील, छोटूलाल रामदास पाटील, जगन्नाथ ब्रिजलाल पाटील, दिलीप बुध्दर पाटील, भिमा गोविंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिरात दात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रक्तदान केले. शिबिरात लोणखेडा, मलोणी, उंटावद, पुरुषोत्तम नगर, होळ मोहिदा, विद्याविहार, शहादा येथील ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला.

व्हीएसजीजीएमचे सदस्य हर्षल पाटील, रुपेश पाटील, नीलेश पाटील, मुकेश पाटील, शुभम पाटील, गौरव पाटील, किशोर भय्या(शेल्टी),विवेक पाटील ,प्रकाश खैरनार, संदीप पाटील, केतन गुजर, अंकुर पाटील, तुषार पाटील, चंद्रकांत पाटील , दीपक गोरख पाटील ,पी.सी.पाटील, हरीश पाटील, कुणाल पाटील, नयन पाटील, हृषीकेश पाटील, जय पाटील, प्रतीक पाटील, वीरेंद्र पाटील, विवेक पाटील, धनंजय पाटील, चेतन पाटील यांनी परिश्रम घेतले. धुळे येथील नवजीवन ब्लड बँकेचे चंद्रकांत दंडगव्हाळ, दिलीप जाधव, विपीन पाटील, उद्धव चौधरी, जयपाल गिरासे, सुवर्णा पवार, पूजा पावरा, लोकमतचे प्रतिनिधी प्रवीण देसले, हितेश पटेल यांचे सहकार्य लाभले.

(या शिबिरात विशेष बाब म्हणजे कुबेर विद्यालय, म्हसावदचे उपशिक्षक युवराज एकनाथ पाटील यांनी ५७ वेळा, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे तालुका अध्यक्ष संजय सदाशिव साळी व सल्लागार योगेश तुकाराम पाटील यांनी २३ वेळा व हाॅटेल मालक योगेश तुकाराम पाटील यांनी १६ वेळा रक्तदान केले आहे.)

(रक्तदान श्रेष्ठदान आहे. लोकमत व व्हीएसजीजीएमचे हे कार्य कौतुकास्पद आहे. कोरोनाच्या या संकटात हे कार्य उल्लेखनीय आहे. पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा... युवराज एकनाथ पाटील.. पोलीस पाटील, लोणखेडा)

(या रक्तदानातून प्लाझ्मा मिळण्यास मदत होईल. लोकमत व व्हीएसजीजीएमचे हे कार्य आदर्श निर्माण करणारे आहे. या उपक्रमाला माझ्या हार्दिक शुभेच्छा..... मयुर दीपक पाटील... युवा नेता, लोणखेडा)(फोटो:- लोणखेडा ता.शहादा येथे आयोजित रक्तदान शिबिरास सदिच्छा भेटी प्रसंगी शहादा नगरपालिका गटनेते प्रा.मकरंद पाटील, संजय पाटील, अशोक पाटील, युवराज पाटील, ईश्वर पाटील, दिलीप पाटील आदी.)