निझर येथील शिबिरात ११५ दात्यांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 12:11 IST2019-12-11T12:11:40+5:302019-12-11T12:11:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : निझर येथील श्रीमती द्वारका बा विद्या मंदिरात रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ११५ ...

Blood donation of 4 donors to a camp in Nizar | निझर येथील शिबिरात ११५ दात्यांचे रक्तदान

निझर येथील शिबिरात ११५ दात्यांचे रक्तदान

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : निझर येथील श्रीमती द्वारका बा विद्या मंदिरात रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ११५ दात्यांनी रक्तदान केले.
मानव अधिकार संघटना, श्रीमती द्वारका बा विद्या मंदिर व अलायन्स क्लब निझर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्टÑीय सेवा योजना विभागातर्फे निझर येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिराला नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. या वेळी प्राचार्या तेवतीया, डॉ.रणजित वळवी, डॉ.सांगळे, निझरचे सरपंच लतेश नाईक, माजी सरपंच तुंबा पटेल, तापी जिल्हा काँग्रेसचे महामंत्री जगदीश पटेल, अलायन्स क्लबचे चेअरमन राठोड, रासेयोचे संजय पटेल, मानव अधिकारी संघटनेचे अ‍ॅड.दिलावर वळवी, अ‍ॅड.सागर मिस्त्री, पंकज अग्रवाल, योगेश मिस्त्री, जितेंद्र वसावा, द्वारकाबा शाळेचे अध्यक्ष विश्वेश पटेल आदी उपस्थित होते. शिबिरात ११५ दात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी रक्तदानाचे महत्व पटवून दिले.

Web Title: Blood donation of 4 donors to a camp in Nizar