धुळवद येथे ३५ दात्यांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:31 IST2021-02-20T05:31:24+5:302021-02-20T05:31:24+5:30

प्रारंभी धुळवद गावातील ज्येष्ठ नागरिक राजाराम मराठे व युवराज ढोणे यांच्याहस्ते शिवपूजन, तर प्रतिमेचे पूजन पं. स. सदस्य धर्मेंद्रसिंग ...

Blood donation of 35 donors at Dhulwad | धुळवद येथे ३५ दात्यांचे रक्तदान

धुळवद येथे ३५ दात्यांचे रक्तदान

प्रारंभी धुळवद गावातील ज्येष्ठ नागरिक राजाराम मराठे व युवराज ढोणे यांच्याहस्ते शिवपूजन, तर प्रतिमेचे पूजन पं. स. सदस्य धर्मेंद्रसिंग रघुवंशी यांच्याहस्ते करण्यात आले. किसन पाडवी व लोटन वाळे यांच्याहस्ते फलक अनावरण करण्यात आले. त्यानंतर झालेल्या शिबिरात ३५ दात्यांनी रक्तदान केले. शिबिरासाठी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. के. डी. सातपुते यांचे मार्गदर्शन लाभले. शिबिरात शासकीय रक्तपेढीचे डॉ. अविनाश चकोर, डॉ. सुशील मराठे, महेंद्र चव्हाण, जितेंद्र चव्हाण, जयेश सोनवणे, धन्या कोकणी, राजेंद्र मोरे यांनी रक्तसंकलन केले. कार्यक्रमासाठी पिंटू ठाकरे, मोहन ढोणे, गोपाल मराठे, देवानंद मराठे, चाणक्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सतीश ढोणे, वसुंधरा फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील, राहुल ढोणे, कन्हैया पटेल, कल्पेश पटेल, वासुदेव मराठे, प्रफुल्ल पटेल, केतन पटेल, प्रकाश ढोणे, तुषार मराठे आदींनी सहकार्य केले. रात्री सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला.

Web Title: Blood donation of 35 donors at Dhulwad