अक्कलकुवा येथील शिबिरात १४१ दात्यांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:32 IST2021-07-30T04:32:30+5:302021-07-30T04:32:30+5:30

शिबिराचे उद्‌घाटन जामिया संस्थेचे अध्यक्ष मौलाना गुलाम मोहम्मद वस्तानवी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपअधीक्षक संभाजी ...

Blood donation of 141 donors in the camp at Akkalkuwa | अक्कलकुवा येथील शिबिरात १४१ दात्यांचे रक्तदान

अक्कलकुवा येथील शिबिरात १४१ दात्यांचे रक्तदान

शिबिराचे उद्‌घाटन जामिया संस्थेचे अध्यक्ष मौलाना गुलाम मोहम्मद वस्तानवी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपअधीक्षक संभाजी सावंत, तहसीलदार सचिन म्हस्के, निवासी नायब तहसीलदार राजेश अमृतकर, संस्थेचे सचिव हाफिज सुलेमान वस्तानवी, मौलाना ओवैस वस्तानवी, शेख अखलाख, अखिल भारतीय खरतरगच्छ युवा परिषदेचे अध्यक्ष मनोज डागा, डॉ. सलीम शेख, डॉ. तनवीर आदी उपस्थित होते. अहमद गरीब युनानी वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या शिबिरात १४१ दात्यांनी रक्तदान केले. यावेळी संस्थेच्यावतीने कोरोना काळात उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. शिबिरासाठी जामियाचे अखलाख शेख, अक्कलकुवा ब्लड डोनेट ग्रुपचे सुधीरकुमार ब्राम्हणे, मौलाना जावेद पटेल, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गणेश पवार, रईसोद्दीन शेख, कारी अब्दुल्ला यांनी परिश्रम घेतले. आय.सी.टी.सी. समुपदेशक महेश कुवर, जनसंपर्क अधिकारी महेंद्र चव्हाण, डॉ. अबसार शेख, अधिपरिचारक लक्ष्मण धनगर, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी जयेश सोनवणे, अधिपरिचारिका तब्बसुम पठाण, हनमंत भिसे, युवराज प्रजापती, राजेंद्र मोरे, मच्छिंद्र वळवी, शरद पाडवी आदींनी रक्त संकलन केले.

Web Title: Blood donation of 141 donors in the camp at Akkalkuwa