शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

भाजप हाच आपला प्रमुख विरोधक राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 11:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पक्ष आदेश प्रमाणे जिल्हा परिषद निवडणुका लढविल्या जातील. भाजप हा प्रमुख विरोधीपक्ष आपला राहणार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पक्ष आदेश प्रमाणे जिल्हा परिषद निवडणुका लढविल्या जातील. भाजप हा प्रमुख विरोधीपक्ष आपला राहणार आहे. जास्तीत जास्त जागा शिवसेनेच्या निवडून येतील या दृष्टीने सर्वांनी कामाला लागावे असे प्रतिपादन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नंदुरबारात झालेल्या मेळाव्यात बोलतांना केले.तालुक्यातील शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी यांची बैठक येथील संजय टाऊन हॉल मध्ये सोमवारी दुपारी झाली. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दिपक गवते, अ‍ॅड.राम रघुवंशी, माजी जि.प.सभापती विक्रमसिंग वळवी, माजी पं.स.सभापती रंजना नाईक, बाजार समिती सभापती किशोर पाटील, माजी जि.प.सदस्य भरत पाटील, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी.के.पाटील, गजेंद्र शिंपी आदी उपस्थित होते.यावेळी पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतल्यानंतर चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले, पक्ष आदेश प्रमाणे जिल्हा परिषद निवडणुकांना सामोरे जायाचे आहे. आपला प्रमुख विरोधी पक्ष हा भाजप राहणार आहे. त्यामुळे भाजपचा पराभव करण्यासाठी जास्तीत जास्त मेहनत सर्व कार्यकर्त्यांनी घ्यावी. महाविकास आघाडी एकत्रीतपणे निवडणूक लढविण्याचे सुतोवाच त्यांनी केले. जे इच्छूक असतील त्यांच्या मुलाखती घेवून ती नावे पक्षाच्या वरिष्ठांकडे पाठविले जातील. एका जागेवर एकापेक्षा अधीकजण इच्छूक असेल तर चर्चेने तो तिढा सोडविला जाणार आहे. परंतु उमेदवारी मिळाली नाही तर बंडखोरी करून निवडणूक लढविणार असाल तर ते सहन केले जाणार नाही. जास्तीत जास्त जागांवर उमेदवार दिले जाणार असून लवकरच उमेदवारीबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.दिपक गवते यांनीही मनोगत व्यक्त करून पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.