अक्कलकुवा येथे भाजपची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:21 IST2021-06-21T04:21:02+5:302021-06-21T04:21:02+5:30

बैठकीत २१ जून ते ८ जुलैदरम्यान भाजपतर्फे घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांबाबत नियोजन करण्यात आले. यावेळी विजय चौधरी व नागेश पाडवी ...

BJP meeting at Akkalkuwa | अक्कलकुवा येथे भाजपची बैठक

अक्कलकुवा येथे भाजपची बैठक

बैठकीत २१ जून ते ८ जुलैदरम्यान भाजपतर्फे घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांबाबत नियोजन करण्यात आले. यावेळी विजय चौधरी व नागेश पाडवी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. बैठकीला अनुसूचित जमाती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष नागेश पाडवी, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष विश्वास मराठे, तालुका अध्यक्ष विनोद कामे, जिल्हा परिषद सदस्य कपिल चौधरी, युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस कुणाल जैन, पंचायत समिती सदस्य किशोर पाडवी, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गुलाब अहिरे, रोहित शुक्ला, व्यापारी आघाडी तालुकाध्यक्ष महेश तंवर, मनोज सोनार, राज खरात, राहुल शेंडे, हेमलाल मगरे, शहर अध्यक्ष खुशाल चौधरी, तालुकाध्यक्ष सुनील सूर्यवंशी, रोहिदास लोहार, संजय शिंपी, किरण पाडवी, मनोज गावीत, किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष देवीदास वसावे, शक्ती केंद्रप्रमुख जितेंद्र वसावे, दिलवरसिंग नाईक, सुरेश पाडवी, मनोज पाडवी, विजय गावीत, मनोज गावीत, हिरालाल वळवी, अक्षय वळवी, मणिलाल पाडवी, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा मथुराबाई पाडवी, दिलीप परदेशी, महेंद्र अहिरे, योगेश पाडवी, सरिताबाई हेमराज पाडवी, अंजनाबाई पाडवी, विजय पाडवी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन कुणाल जैन यांनी, तर आभार विनोद कामे यांनी मानले. यावेळी अक्कलकुवा शहर व तालुक्यातील तरुणांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Web Title: BJP meeting at Akkalkuwa