शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमध्येही बर्ड फ्ल्यूची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 11:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : नवापूर येथे बर्ड फ्ल्यूनंतर गुजरातच्या उच्छल मध्ये बर्ड फ्लूची लागण झाल्याचे समोर आले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : नवापूर येथे बर्ड फ्ल्यूनंतर गुजरातच्या उच्छल मध्ये बर्ड फ्लूची लागण झाल्याचे समोर आले आहे. नवापुरात बर्ड फ्लूचे कलिंग ऑपरेशन संपत नाही तोच शेजारील गुजरात राज्यात बर्ड फ्लूची लागण झाल्याने पोल्ट्री व्यावसायिक व प्रशासनाच्या चिंता वाढल्या आहेत. नवापूर येथील बर्ड फ्ल्यू पेक्षा गुजरात राज्यातील बर्ड फ्ल्यूची तीव्रता अधिक असल्याचे प्राप्त झालेल्या अहवालानुसार समोर आल्याचे पशुसंवर्धन सूत्रांनी सांगितले आहे.नवापूर तालुक्यातील २२ पोल्ट्री मधील बर्ड फ्लू अहवाल एच५एन८ विष्णाणू बाधित होते. परंतू गुजरात राज्यातील नेशनल पोल्ट्रीतील बर्ड फ्लू अहवाल एच५एन१ आला आहे. परंतू या पोल्ट्रीतील संचालक अनीस टिमोल यांनी सांगितले की, येथील पोल्ट्रीत पक्ष्यांचा मृत्यू झालेला नाही. गुजरात राज्यातील पशुसंवर्धन विभागातील अधिकारी नियमित तपासणी करीत आहे. अहवाल पॉझीटीव्ह आल्याने तापी जिल्हा प्रशासन व पशुसंवर्धन पोल्ट्रीतील पक्षी नष्ट करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.दरम्यान याबाबत नवापूरचे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना संपर्क केला असता, उच्छलच्या नॅशनल पोल्ट्री नजीक महाराष्ट्रातील एक किलोमीटर परिसरात किती पोल्ट्री येतात याची पाहणी करून पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांसह चर्चा करून पुढील कलिंग ऑपरेशन ठरविण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली. गुजरात राज्यातील उच्छल येथील नॅशनल पोल्ट्रीत १९७२ साली सुरू करण्यात आली आहे. नवापूर परिसरातील सर्वांत जुनी पोल्ट्री आहे. यात एकूण १७ हजार कुकुट पक्षी आहे. अहवाल पॉझीटीव्ह आल्याने गुजरात राज्यातील पथक पाहणीसाठी घटनास्थळी दाखल झाले आहे. नवापूरात बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याने गुजरात राज्यातील सुरुवातीच्या काळात महाराष्ट्र पोलिसांनी बंदोबस्त दिला होता. या संदर्भात उच्छल पोलिसांना कुठलीही माहिती नव्हती. उच्छल पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिराने पोलिस बंदोबस्त दिला होता. गुजरात राज्यात बर्ड फ्लू लागण होऊ नये, म्हणून महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांकडून काळजी घेण्यात आली. परंतू गुजरात राज्यातील अधिकाऱ्यांकडून काही अंशी दुर्लक्ष झाल्याचे बोलले जात आहे. नंदुरबारचे जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भारुड यांनी  शेजारील गुजरात मधील तापी व डांग जिल्ह्यातील जिल्हाधिकार्‍यांना नवापूर च्या संदर्भात खबरदारी म्हणून माहिती देत त्यांच्यासोबत चर्चा केली होती. यानंतर देखील गुजरात राज्यात बर्ड फ्लू शिरकाव झाला असल्याने चिंता वाढल्या आहेत. 

दुस-यांदा बर्ड फ्ल्यू n नवापूर तालुक्यात फेब्रुवारी २००६ नंतर दुस-यांदा ६ फेब्रुवारी २०२१ ला बर्ड फ्लू चा शिरकाव झाल्याने आठवड्याभरात राज्यातील सर्वात मोठे कलिंग ऑपरेशन २४ पोल्ट्रीत राबविण्यात आले. यात एकूण ५ लाख ७८ हजार ८९० कुकुट पक्षी नष्ट केले तर २५ लाख १३ हजार ३९२ अंडी नष्ट करण्यात आली आहे. उर्वरित पाच पोल्ट्रीतील कलिंग ऑपरेशन पुढील आदेश आल्यावर मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी आहे.