शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

शहादा तहसीलला बायोमेट्रिक सिस्टीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:58 IST

शहादा : अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वयंशिस्तीची जाणीव व्हावी, नागरिकांची कामे वेळेत व्हावीत, यासाठी येथील तहसील कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी यंत्र ...

शहादा : अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वयंशिस्तीची जाणीव व्हावी, नागरिकांची कामे वेळेत व्हावीत, यासाठी येथील तहसील कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी यंत्र बसविण्यात आले आहे. तहसीलदारांपासून ते थेट शेवटच्या कर्मचाऱ्यांपर्यंत साऱ्यांचीच हजेरी या बायोमेट्रिक यंत्राद्वारे सुरू करण्यात आली आहे. परिणामी प्रामाणिक कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढेल तर दांडी बहाद्दरांना निश्चितच पूर्णवेळ थांबावे लागणार आहे.

शासकीय कार्यालय म्हटलं म्हणजे साहेब एवढ्यात होते, तुम्ही यायच्या अगोदरच जेवायला गेले आहेत आता येतीलच, मिटींगला गेलेत, पंचनाम्यासाठी ग्रामीण भागात आहेत हे सगळे परवलीचे शब्द ग्रामीण भागातून कार्यालयात कामकाजानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या कानी पडतात. त्यामुळे नागरिकांचे एका खेपेत काम होणे म्हणजे दुर्लभच. येथील तहसील कार्यालय हे शहरापासून काही अंतरावर असल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना बसस्थानकापासून रिक्षा करुन कार्यालयात जावे लागते. साहजिकच वेळेवर संबंधित अधिकारी, कर्मचारी कार्यालयात न मिळाल्यास काम तर होतच नाही शिवाय वेळ व पैसाही खर्च होतो. तहसील कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी यंत्र लावल्याने कर्मचाऱ्यांची वेळेवर उपस्थिती व कामकाजाला निश्चितच गती प्राप्त होईल. साहजिकच प्रशासनातील मुख्य अधिकाऱ्यांना कोण कर्मचारी कामावर आहेत व कोण रजेवर आहेत, याची इत्यंभूत माहितीही मिळेल. शिवाय कामकाजात गती येऊन जनतेची कामेसुद्धा वेळेवर होण्यास मदत होईल. सध्या घरकुले, संजय गांधी, रेशनकार्ड, जमीन व्यवहार अशा वेगवेगळ्या योजनांच्या लाभार्थ्यांची वर्दळ तहसील कार्यालयात असते. अधिकारी किंवा कर्मचारी जागेवर नसल्यास लाभार्थ्यांच्या पदरी निराशा येते. अर्थात अधिकारी जिल्हा मुख्यालयात बैठकीसाठी अथवा कामासाठी गेले तर त्यादिवशी बहुतेक ठिकाणी काही कर्मचारी टेबलावर हजर नसतात, असा आरोप ग्रामस्थांकडून होतो तर काही कर्मचारी कार्यालय सुटण्याच्या आधीच म्हणजे पाच वाजेपर्यंतच निघून जात असल्याचे नागरिक सांगतात. आता बायोमेट्रिक हजेरीमुळे कार्यालयाबाहेर काही शासकीय काम नसल्यास पूर्णवेळ अधिकारी व कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहतील व नागरिकांचे काम यामुळे सुकर होईल.