शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
3
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
4
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
5
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
6
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
7
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
8
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
9
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
10
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
11
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
12
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
13
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
14
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
15
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
16
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
17
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
18
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
19
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
20
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेतील बडे नेते गोत्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:28 IST

जिल्हा परिषदेतील आरक्षणासंदर्भात शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे राज्यातील सहा जिल्हा परिषदेतील विद्यमान पदाधिकाऱ्यांना धक्का बसला आहे. विशेषत: नंदुरबार ...

जिल्हा परिषदेतील आरक्षणासंदर्भात शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे राज्यातील सहा जिल्हा परिषदेतील विद्यमान पदाधिकाऱ्यांना धक्का बसला आहे. विशेषत: नंदुरबार जिल्हा परिषदेतील ११ गट आणि पंचायत समितीचे १४ गणात त्याचा फटका बसला आहे. राज्य निवडणूक आयोगाने तातडीने न्यायालयाच्या आदेशाची दखल घेत संबंधित जागा रिक्त झाल्याचे आदेश काढले असून त्याबाबत स्वतंत्रपणे निवडणूक कार्यक्रम देण्याचेही जाहीर केले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील प्रतिष्ठीत आणि बड्या नेत्यांना त्याचा धक्का पोहोचला असून जिल्ह्यातील राजकारण पुन्हा गतिमान झाले आहे.

जिल्हा परिषदेतील आरक्षणाचा मुद्दा निवडणुकीपूर्वीच वादातीत ठरला होता. यासंदर्भात उच्च न्यायालय आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल झाल्या होत्या. त्यामुळे मुदत संपूनही राज्य शासनाने सहा जिल्हा परिषदांमध्ये प्रशासक नेमणूक व त्यानंतर कार्यकारिणीला मुदतवाढ दिली होती. तब्बल वर्षभर निवडणुका न झाल्याने निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयातील याचिकांचा निकालाच्या अधिन राहून निवडणुका घेतल्या होत्या. तब्बल वर्षभरानंतर आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्याने त्या निकालानुसार राज्य निवडणूक आयोगानेही संबंधित जागा रिक्त झाल्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे तेथील निवडणूक नव्याने होण्याचे संकेत आहेत.

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नंदुरबार जिल्हा परिषदेतील ११ जागा ह्या ओबीसी प्रवर्गासाठी होत्या. त्यात खापर, अक्कलकुवा, म्हसावद, लोणखेडा, पाडळदा, कहाटूळ, कोळदे, खोंडामळी, कोपर्ली, रनाळे, मांडळ या गटांचा समावेश आहे. तर पंचायत समितीच्या शहादा तालुक्यातील आठ, नंदुरबार तालुक्यातील पाच व अक्कलकुवा तालुक्यातील एका गणाचा समावेश आहे. या जागा न्यायालयाचा निकाल लागल्यापासून अर्थात ४ मार्चपासून रिक्त झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. संबंधित पदाधिकाऱ्यांना ९ मार्चपर्यंत आदेश बजावून १० मार्चपर्यंत निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी अहवाल मागविला आहे. एकूणच या आदेशामुळे जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे. कारण या आदेशाचा परिणाम विद्यमान जिल्हा परिषदेचे तीन सभापती तर इतर आठ प्रतिष्ठीत सदस्यांवर होणार आहे.

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर पदाधिकाऱ्यांची निवड करताना राजकारणाचे अजब समीकरण अस्तित्वात आले आहे. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेची महाविकास आघाडी असली तरी येथे मात्र काँग्रेस-शिवसेना आणि भाजपचे सभापती आहेत. अंतर्गत राजकीय मतभेद कमालीचे आहेत. त्यामुळे जर नवीन निवडणुका लागल्या तर सत्ता जरी तीन पक्षाची असली तरी उमेदवारीसाठी इच्छुक सर्वच पक्षातील राहणार आहेत. त्यातील समझोता करणे नेत्यांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. म्हणून निकाल जाहीर झाल्यापासून अंतर्गत राजकीय घडामोडींना वेग आला असून त्यावर काय करता येईल यासाठी सर्वच बाबीने नेत्यांचा व विद्यमान सदस्यांचा विचार सुरू झाला आहे. काहींनी आतापासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली आहे तर काहींनी मात्र निवडणूक होऊ नये यासाठी काय करता येईल त्याचाही अभ्यास सुरू केला आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर सुरुवातीचा बराच काळ नेत्यांच्या आणि पक्षीय मतभेद मिटविण्यात गेला. त्यातच एका सभापतीच्या खाते बदलाचा वाद रंगला. तो थेट न्यायालयापर्यंत गेला आहे. हा वाद मिटत नाही तोच पुन्हा नव्याने निवडणुकीची चर्चा सुरू झाल्याने जिल्हा परिषदेतील राजकारणाला आता पुन्हा नवे वळण लागण्याची चिन्हे आहेत.