शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

लहान भावाने केला मोठया भावाचा दगडान ठेचून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 11:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सततच्या आजाराला कंटाळलेल्या मोठ्या भावाने स्वत:च आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु त्यात त्याला अपयश आल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सततच्या आजाराला कंटाळलेल्या मोठ्या भावाने स्वत:च आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु त्यात त्याला अपयश आल्याने त्याने लहान भावाला दगड डोक्यात घालण्याचे सांगितले. लहान भावाने त्याचे ऐकुण त्याच्या डोक्यात तीन वेळा दगड घालून ठार केले व स्वत:च पोलिसात जावून याची माहिती दिली. नंदुरबारातील जिल्हा रुग्णालयासमोर सकाळी घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.प्रकाश भटू पाटील (३५) रा.महालक्ष्मीनगर, हमालवाडा, नंदुरबार असे मयताचे नाव आहे. तर राहुल भटू पाटील असे संशयीत आरोपी अर्थात लहान भावाचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश भटू पाटील हे नेहमीच आजारी राहत होते. त्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात देखील दाखल करण्यात आले होते. सततच्या आजाराला कंटाळून प्रकाश पाटील यांनी रविवार, ८ रोजी सकाळी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ही बाब त्यांचा लहान भाऊ राहुल पाटील याला कळाली. तो जिल्हा रुग्णालयाकडे गेला असता रुग्णालयाच्या अलीकडे पेट्रोल पंपाजवळ प्रकाश पाटील हे त्यांना दिसले. ते त्याच्या मागे पेट्रोलपंपा मागील शेतात गेले. तेथे प्रकाश पाटील यांनी स्वत: मरणाचा प्रयत्न केला. परंतु त्यात ते अयशस्वी झाले. त्यानंतर त्यांनी भाऊ राहुल यास ठार मारून मुक्ती दे म्हणून सांगितले. त्यांचे एकुण राहुल याने तेथे पडलेला मोठा दगड घेवून प्रकाश यांच्या डोक्यात घातला.तीन वेळा दगड डोक्यात घातल्यानंतर राहुल हे तेथून तडक नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला. तेथे पोलिसांना हकीकत सांगितल्यानंतर लागलीच पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही माहिती दिली. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय अधिकारी रमेश पवार, पोलीस निरिक्षक सुनील नंदवाळकर, सहायक निरिक्षक एस.आर.दिवटे, थोरात यांनी घटनास्थळी धाव घेतले. पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविला.याबाबत स्वत: राहुल पाटील यानेच फिर्याद दिल्याने त्याच्याच विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक निरिक्षक दिवटे करीत आहे. संशयीत राहुल यास अडक करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पाटील बंधुंमध्ये फारसा कौटूंबिक वाद नव्हता. परंतु आजारपणामुळे कुटूंब त्रस्त झाले होते. त्यातूनच हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.स्वत: मारेकरीच पोलीस ठाण्यात येवून खुनाची माहिती देत असल्याने ड्युटीवरील पोलीस देखील अवाक झाले. लागलीच वरिष्ठांना आणि नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली.४मयत प्रकाश पाटील यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. सायंकाळी चार वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुले असा परिवार असल्याचे सांगण्यात आले.