शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
4
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
5
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
6
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
9
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
10
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
11
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
12
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
13
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
14
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
15
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
16
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
17
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
18
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
19
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
20
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात शिवस्मारक परिसर सुशोभिकरणाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:31 IST

शहादा-दोंडाईचा रस्त्यावर शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लोकवर्गणीतून बसविण्यात येणार असून यासाठी पालिका प्रशासनाने सुमारे १० हजार ...

शहादा-दोंडाईचा रस्त्यावर शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लोकवर्गणीतून बसविण्यात येणार असून यासाठी पालिका प्रशासनाने सुमारे १० हजार स्क्वेअर फूट जागा शिवस्मारक समितीला उपलब्ध करून दिली आहे. या नियोजित शिवस्मारक परिसराच्या जागेत पालिकेच्या वतीने सुशोभिकरण करण्यात येणार असून आकर्षक रोशणाईसह येथे भेट देणाऱ्या नागरिकांना प्रेक्षक गॅलरी करण्यासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातील अनेक महत्त्वाच्या घटना चित्रमय स्वरूपात नागरिकांसाठी ठेवण्यात येणार आहेत. या सुशोभिकरणाच्या कामाला पालिकेतील सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी एकमुखाने ठराव मंजूर करीत पाठिंबा दिला असल्याने आता सुमारे ५३ लाख ५१ हजार ३४० रुपये खर्चाला मान्यता दिली आहे. गुरुवारी मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा शहरात असावा यासाठी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिवस्मारक समितीची स्थापना करण्यात आली आहे. लोकवर्गणीतून सुमारे ५० लाख रुपये खर्चाचा सुमारे चौदा फूट उंचीचा व पावणेतीन टन वजनाचा अष्टधातूपासून तयार करण्यात आलेल्या पुतळ्याची निर्मिती मुंबई येथील शिल्पकार चंद्रजित यादव हे तयार करीत आहेत. शिवस्मारक समितीच्यावतीने या पुतळ्यासाठी लोकवर्गणीतून जमा झालेले २५ लाख रुपयांचा धनादेश अनामत म्हणून देण्यात आलेला आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत या पुतळ्याची निर्मिती पूर्ण होणार असून तो शहाद्याला आणण्यात येणार आहे.

पालिका प्रशासनाच्या वतीने १ मेपर्यंत संपूर्ण परिसराचे सुशोभिकरण व विद्युतीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले असून शिवस्मारक समिती व पालिका प्रशासनाच्या वतीने १५ मेपर्यंत या परिसरात भव्य अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविला जाणार आहे.

गुरुवारी झालेल्या भूमिपूजनप्रसंगी जि.प.चे कृषी सभापती अभिजित पाटील, पालिकेचे गटनेते प्रा.मकरंद पाटील, धनंजय वडनेरे, नगर अभियंता संदीप टेंभेकर, राजेंद्र जोहरी, प्रा.नेत्रदीपक पवार, उमेश पाटील, ठेकेदार सिद्धार्थ साळुंखे, शिवस्मारक समितीचे मनोहर सैंदाणे यांच्यासह पालिकेचे नगरसेवक विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते

शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असावा ही नागरिकांची जुनी मागणी होती. पालिकेतील सर्व पक्षाचे नगरसेवक व शिवस्मारक समितीच्या माध्यमातून परिसराचे सुशोभिकरण केले जाणार आहे. लोकवर्गणीच्या माध्यमातून पुतळा बसविण्यात येणार असल्याने शहरातील दानशूर नागरिकांसह शिवप्रेमी नागरिकांनी समितीला आर्थिक सहाय्य करावे. १५ मेपर्यंत पुतळा बसविण्यात येणार आहे.

-अभिजित पाटील, सभापती, कृषी व पशुसंवर्धन समिती, जि.प. नंदुरबार

शहरातील नागरिकांच्या मागणीला पालिकेच्या सर्व नगरसेवकांनी पाठिंबा देत लोकभावनेचा आदर करीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात येणार आहे. हे शिवस्मारक भविष्यातील पिढीसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. कुठल्याही प्रकारचे राजकारण न करता सर्वांच्या सहकार्याने एक आदर्श स्मारक म्हणून या शिवस्मारकाचा लौकिक असणार आहे.

-प्रा.मकरंद पाटील, गटनेते, शहादा नगरपालिका