रेवानगर येथे अंगणवाडी बांधकामाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:21 IST2021-06-18T04:21:48+5:302021-06-18T04:21:48+5:30

मागील पाच ते सहा वर्षांपासून रेवानगर येथील जुन्या अंगणवाडीच्या इमारतीला तडे गेले होते. पावसाळ्यात पाणी गळत असल्याने बालकांचीही गैरसोय ...

Bhumi Pujan of Anganwadi construction at Rewanagar | रेवानगर येथे अंगणवाडी बांधकामाचे भूमिपूजन

रेवानगर येथे अंगणवाडी बांधकामाचे भूमिपूजन

मागील पाच ते सहा वर्षांपासून रेवानगर येथील जुन्या अंगणवाडीच्या इमारतीला तडे गेले होते. पावसाळ्यात पाणी गळत असल्याने बालकांचीही गैरसोय होत होती. अंगणवाडी सेविका ज्योती पावरा हिने अंगणवाडी बालकांना स्वतःच्या घरात बसवायला सुरुवात केली होती. याबाबत विद्यमान सरपंचांकडे तक्रारही केली होती. रेवानगरचे सरपंच हिरालाल पावरा यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा यांच्याकडे याबाबत व्यथा व्यक्त केली होती. त्याची तत्काळ दखल घेत जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी यांनी जनसुविधेअंतर्गत चार महिन्यात अंगणवाडी इमारतीला मंजुरी दिली. बुधवारी या नवीन अंगणवाडी इमारत बांधकामाचे सीमा वळवी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या वेळी सरपंच हिरालाल पावरा, उपसरपंच संगीता पावरा, ग्रा.पं. सदस्य शकीला पावरा, दिलीप पावरा, निशाबाई वळवी, कैलास वळवी, चिमा पावरा, जेठ्या पावरा, नाथ्या पावरा, डेमच्या पावरा, दिनेश पावरा, दुलबा पावरा, वसंत पावरा, नगाऱ्या पावरा, आपसिंग पावरा, जान्या पावरा, कोमा पावरा, जोदा पावरा, पोड्या पावरा, नायका पावरा, बुला पावरा, लोट्या पावरा, ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Bhumi Pujan of Anganwadi construction at Rewanagar