शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

फेसबूक अकाऊंटवरून पैसे मागितले तर सावधान..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:33 IST

नंदुरबार : फेसबुक अकाऊंट हॅक करून किंवा बनावट अकाऊंट तयार करून त्या माध्यमातून पैशांची मागणी करण्याचे प्रकार वाढले आहेत. ...

नंदुरबार : फेसबुक अकाऊंट हॅक करून किंवा बनावट अकाऊंट तयार करून त्या माध्यमातून पैशांची मागणी करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यातून अनेकजणांना आर्थिक फटका बसला आहे. अलीकडच्या काळात या तक्रारींचे प्रमाण वाढले असून सायबर पोलिसांकडेही तक्रारी दाखल आहेत.

आजच्या आधुनिक युगात लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकजण वेगवेगळ्या समाज माध्यमांवर सक्रिय असतात. त्यात फेसबुकचा वापर देखील मोठा आहे. ही बाब लक्षात घेऊन अनेक सायबर गुन्हेगार त्याचा उपयोग आर्थिक गुन्हे करण्यासाठी करीत असल्याचे दिसत आहे. अनेकांचे फेसबुक अकाऊंट हॅक केले जात असून त्या माध्यमातून मित्रांकडून पैशांची मागणी केली जात आहे. अडचणीत असल्याने तातडीने माझ्या अकाऊंटला पैसे पाठवा म्हणून विनवणी केली जाते. जवळचा मित्र किंवा नातेवाईक त्याला बळी पडून दिलेल्या अकाऊंट नंबरवर पैसे देखील टाकत असतात. सध्या हे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपले फेसबुक अकाऊंटचा पासवर्ड वेळोवेळी बदलत राहावा तसेच विनाकामाच्या आणि अश्लील साईट सर्च करू नये त्या माध्यमातूनच हे प्रकार वाढत असल्याचे बोलले जात आहे.